हजारो शिवभक्त झाले शिवचरणी नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:10 PM2018-02-13T23:10:23+5:302018-02-13T23:10:43+5:30
येथील चुलबंद नदी तिरावर महाशिवरात्री यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले होते.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : येथील चुलबंद नदी तिरावर महाशिवरात्री यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हजारो शिवभक्तांनी भोळ्या शंकराचे दर्शन घेऊन मंगलमय जीवनाची इच्छापूर्ती मागितली.
लाखांदूर येथील चुलबंद नादीतीरावर जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी शिवमंदिराची स्थापना केली आहे. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षी अनेक मान्यवर, साधुसंत तसेच मनोरंजनात्मक कतेयक्रमाचे आयोजन केले जाते.
या वर्षी सुप्रसिद्ध गायक टीव्ही स्टार आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना भक्तिसंगीत गायनाच्या कार्यक्रमातून मनोरंजन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा बैंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, कांग्रेस सचिव प्रमिला कुटे, मधुकर लीचडे, पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे, भुमेशवर महावडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, शुधोमता नंदगवली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, सभापती प्यारेलाल वाघमारे, सभापती प्रेम वणवे, लक्ष्मण बगमारे, मदन रामटेके, कानिराम मातेरे, मनोरमा चंद्रिकापुरे, गुलाब कापसे, राजेंद्र ठाकरे व हजारो शिवभक्त उपस्थित राहणार होते.
या यात्रेचे मुख्य आयोजक जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, तारा डोंगरे,ज्ञानेश्वर डोंगरे,हसीना डोंगरे यांनी शिवभक्तांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेसाठी विशेष लक्ष देण्यात आले होते.