हजारो मासोळ्यांचा मृत्यू

By admin | Published: June 2, 2016 02:00 AM2016-06-02T02:00:31+5:302016-06-02T02:00:31+5:30

उदरनिर्वाहासाठी ढिवर बांधवांनी मालगुजारी तलावात मासोळ्यांचे बिज टाकण्यात आले. मात्र प्रखर उन्हामुळे जलस्रोत आटल्याने तलाव कोरडा ठाक पडला आहे.

Thousands of fish fish | हजारो मासोळ्यांचा मृत्यू

हजारो मासोळ्यांचा मृत्यू

Next

लाखोंचे नुकसान : चकारा मामा तलावातील
विशाल रणदिवे अड्याळ
उदरनिर्वाहासाठी ढिवर बांधवांनी मालगुजारी तलावात मासोळ्यांचे बिज टाकण्यात आले. मात्र प्रखर उन्हामुळे जलस्रोत आटल्याने तलाव कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे येथील शेकडो मासोळ्यांवर तडफडून मृत्यू ओढावला आहे. यामुळे ढिवर बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अड्याळ येथून जवळच असलेल्या चकारा मालगुजारी तलावात हा प्रकार घडला आहे. ३० एकरात विस्तीर्ण असलेल्या या तलावाच्या निर्मितीपासून अद्याप तलावातील गाळ उपसा करण्यात आलेला नाही. चकारा मालगुजारी तलावात मागील १० वर्षापासून अड्याळ येथील तुळशीराम नगरे हे मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात.
हमात्र तलावाची खोलीकरण झाले नसल्याने पाण्याचा साठा अत्यल्प होता. त्यातच प्रखर उष्णतेने जलस्रोत आटला आहे. त्यामुळे येथील हजारो मासोळ्या तडफडून मेल्या आहेत. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवराव नगरे यांनी केली आहे.

Web Title: Thousands of fish fish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.