पाच हजार क्ंिवटल धानाचे चुकारे रखडले

By admin | Published: July 8, 2016 12:32 AM2016-07-08T00:32:46+5:302016-07-08T00:32:46+5:30

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी रब्बीची धान विक्री केली. पाच हजार क्विंटल धानाचे चुकारे अद्यापपर्यंत मिळाले नाही.

Thousands of five thousand pistols were stolen | पाच हजार क्ंिवटल धानाचे चुकारे रखडले

पाच हजार क्ंिवटल धानाचे चुकारे रखडले

Next

आष्टी येथील प्रकार : आधारभूत खरेदी केंद्रावर प्रश्नचिन्ह
तुमसर : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी रब्बीची धान विक्री केली. पाच हजार क्विंटल धानाचे चुकारे अद्यापपर्यंत मिळाले नाही. सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. आष्टी येथील केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यात असंतोष आहे.
तुमसर तालुक्यात आष्टी येथे रब्बी मोसमात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने येथील शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी सुमारे पाच हजार क्विंटल धानाची विक्री केली होती. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी धानाचे चुकारे मिळाले नाही. सध्या खरीप धानाची रोवणी करणे सुरू आहे. हातात पैसा नाही. धानाची रोवणी कशी करावी, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
शासकीय आधारभूत धान केंद्रावर विक्री केल्यानंतर तात्काळ पैसा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. येथे शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाली आहे. उलट खाजगी संस्था अथवा व्यक्तींना धान विक्री केली असती तर तात्काळ धानाचे चुकारे देण्यात येतात. शासन येथे चुकारे देण्यास विलंब करीत आहे. लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. हा परिसर एकतर दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे चुकारे येथे द्यायलाच पाहिजे होते. शासन येथे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

आष्टी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्री केली. खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी चुकारे मिळाले नाही. शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल.
-दिलीप सोनवाने, उपसरपंच चिखला.

Web Title: Thousands of five thousand pistols were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.