हजारो लिटर पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:30 PM2019-02-12T21:30:51+5:302019-02-12T21:31:05+5:30

शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी येथील हुतात्मा स्मारकात फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. गत २० दिवसांपासून हा प्रकार सुरु असून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या नगरपरिषदेचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

Thousands of liters of water on the streets | हजारो लिटर पाणी रस्त्यावर

हजारो लिटर पाणी रस्त्यावर

Next
ठळक मुद्देजलवाहिनी फुटली : तुमसरच्या हुतात्मा स्मारक परिसरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी येथील हुतात्मा स्मारकात फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. गत २० दिवसांपासून हा प्रकार सुरु असून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या नगरपरिषदेचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणी म्हणजे जीवन. उन्हाळ्यात पाण्याची खरी किंमत कळते. टंचाईच्या काळात पाण्याच्या थेंबासाठी नागरिक व्याकुळ होतात. मात्र तुमसर शहरात गत २० दिवसांपासून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. गत २० दिवसांपासून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तुमसर शहरात जणू गंगा अवतरल्याचा भास होत आहे. विशेष म्हणज या स्थळापासून जलशुद्धीकरण केंद्र हाकेच्या अंतरावर आहै. नेहरु क्रीडांगणावर येणाºया नागरिकांचे याकडे लक्ष गेले. त्यापैकी भूपेश वासनिक यांनी याबाबत माहिती दिली. एकीकडे पाण्याची टंचाई असून तांत्रिक बिघाड दुरुस्त न केल्याने पाणी वाया जात आहे. याचा फटका तुमसरकरांना बसत आहे. नगरपरिषदेने येथे तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. नगरपरिषदेकडे तांत्रिक कर्मचारी आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. गत २० दिवसांपासून रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पाणी बचतीचा संदेश द्यायचा आणि फुटलेली साधी जलवाहिनी दुरुस्ती करायची नाही असा काहीसा प्रकार तुमसर शहरात दिसत आहे. आता कितीदिवस पाणी रस्त्यावर वाहणार हा प्रश्न आहे.

Web Title: Thousands of liters of water on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.