‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’च्या घोषणांनी लाखनी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:27 PM2019-01-05T21:27:46+5:302019-01-05T21:27:58+5:30
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ फेडेरेशन आॅफ आॅब्स्टट्रिक व गायनेकॉलॉजिकल सोसायटिस आॅफ इंडिया (फॉगसी) च्या पुढाकाराने प्रसूति व स्त्रीरोग तज्ञ संघटना व इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा भंडारा, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा यांचा सहभागाने ‘वॉक फॉर अ कॉर्स’ नॅशनल वॉकेथानआयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ फेडेरेशन आॅफ आॅब्स्टट्रिक व गायनेकॉलॉजिकल सोसायटिस आॅफ इंडिया (फॉगसी) च्या पुढाकाराने प्रसूति व स्त्रीरोग तज्ञ संघटना व इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा भंडारा, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा यांचा सहभागाने ‘वॉक फॉर अ कॉर्स’ नॅशनल वॉकेथानआयोजित करण्यात आला होता.
बेटी बचाओ - बेटी पढाओच्या ललकाऱ्यांसोबत महिला स्वास्थ्य, सशक्तिकरण आणि सन्मान, पर्यावरण संरक्षण स्त्रीभ्रूणहत्या विरोध असणारी रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ भरत लांजेवार- अध्यक्ष, डॉ मनोज आगलावे - सचिव प्रसूति व स्त्रीरोग तज्ञ, आल्हाद भांडारकर -राष्ट्रीय शिक्षण संस्था, वैद्यकीय संघटना- डॉ एल.डी. गिरेपुंजे, आयुर्वेदिक डॉक्टर संघटना- डॉ चंद्रकांत निंबार्ते, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन शिवणकर, ग्रिन फ्रेंड्स नेचर क्लब अशोक गायधने, सृष्टी नेचर क्लब अर्पित गुप्ता, लोकमत सखी मंच शिवानी काटकर जिल्हा भंडारा उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले होते.
राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा यांनी नाटक सादर केले. निखाडे यांनी सावित्रीच्या मुली यावर गीत सादर केले. या सर्वांसोबत सर्व शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यात सहभागी होते.
बेटी बचाओ-बेटी पढाओ रॅलीला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्काऊट पथक, एनसीसी पथक, यशस्वी महिलांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी यांची रॅली सिंधी लाइन पर्यंत काढण्यात आली. यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरीता डॉ राजहंस, डॉ. मीरा आगलावे, आडे, हेमाने, सोनाली बावणे, भुसारी, गद्रे आदींनी सहकार्य केले.