हजारो कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 12:27 AM2016-04-10T00:27:59+5:302016-04-10T00:27:59+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षाचा समारोपीय कार्यक्रम नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथे ...
डॉ. आंबेडकर जयंती समारोप : सोनिया, राहुल गांधी उपस्थित राहणार
भंडारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षाचा समारोपीय कार्यक्रम नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथे ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. याला अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या निमित्त जादीर सभेला राज्यभरातून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात शुक्रवारला जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमेटीचे निरीक्षक हुकूमचंद आमधरे उपस्थित होते. माजी आमदार आनंदराव वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
यावेळी अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी आमदार अनिल बावनकर, सेवक वाघाये, मधुकर लिचडे, बशीर पटेल, प्रमोद तितीरमारे, युवराज वासनिक, महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, सभापती विनायक बुरडे, नारायण तितीरमारे, मनोहर सिंगनजुडे, चुन्नीलाल ठवकर, राजकुमार मेश्राम, प्रेमसागर गणवीर, शिशिर वंजारी, मोहाडी न.प. चे अध्यक्षा स्वाती निमजे, लाखनी न. पं. अध्यक्षा कल्पना भिवगडे, न.प. पक्ष नेता शमीम शेख, प्रसन्न चकोले, अनिक जमा, अजय गडकरी, डॉ.विनोद भोयर, भूषण टेंभुर्णे, गणेश निमजे, सुरेश मेश्राम, जि.प. पक्ष नेता ज्ञानेश्वर रहांगडाले, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, प्रभु मोहतुरे, अमर रगडे, शंकर राऊत, सुनील गिऱ्हेपुंजे, नंदू समरीत, भूमेश्वर महावाडे, अश्विन नशिने उपस्थित होते.
यावेळी हुकूमचंद आमधरे यांनी, डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी नागपूरला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन केले. बैठकीला बाळू कायते, प्यारेलाल वाघमारे, प्रेमदास वनवे, होमराज कापगते, रमेश डोंगरे, प्रणाली ठाकरे, वंदना पंधरे, मंदा गणविर, शुध्दमता नंदागवळी, बाळा ठाकूर, विनीता देशपांडे, स्रेहल रोडगे, स्वाती लिमजे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)