टसर रेशीम केंद्रात धागाकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:42 PM2017-08-13T23:42:55+5:302017-08-13T23:43:19+5:30

येथे डीसीटीसी भंडारा यांचे मार्फत केंद्रीय रेशीम मंडळ यांचे मार्फत टसर रेशीम धागाकरण प्रशिक्षण कार्यक्रमांंतर्गत.....

Threading demonstration program at Tusser Silk Center | टसर रेशीम केंद्रात धागाकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम

टसर रेशीम केंद्रात धागाकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव/पवनी : येथे डीसीटीसी भंडारा यांचे मार्फत केंद्रीय रेशीम मंडळ यांचे मार्फत टसर रेशीम धागाकरण प्रशिक्षण कार्यक्रमांंतर्गत बुनियाद मशिनवर धागाकरणाचे प्रत्यक्षिक आयोजन करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय रेशीम मंडळाचे पी. जे. कोलारकर सहायक निदेशक अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व्ही. पी. रायसींग प्रकल्प अधिकारी, अरविंद आसई अध्यक्ष पवन विणकर सह.संस्था व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बुनियाद मशीन ही राज्यात प्रथमच नव्याने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मशीनवर धागा निर्मिती करणेसाठी महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यापुर्वी मटक्यावर घीचा धागा निर्मिती केली जात होती. तर मटका वापर बंद करुन मशीनद्वारे कामे करणे प्रस्तावित आहे. तसेच मशीनद्वारे निर्मित धाग्याची प्रत तपासणे व सदर धागा कापड निर्मिती करीत वापरणे असे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षणा दरम्यान पवनी येथील १७ महिलांना याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय रेशीम मंडळाचे कांबळ तांत्रिक सहायक तसेच जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा यांचे अधिकारी व कर्मचारी सतत प्रशिक्षण केंद्रावर लक्ष देवून आहेत. टसर धाग्याची प्रत चांगली राखण्यासाठी कडू केंद्रीय रेशीम मंडळ, यांनी सखोल माहिती महिलांना देत आहेत. शिक्षण संपल्यानंर १७ महिलांना कायमस्वरुपी टसर धागा निर्मितीचे काम महिलांना पवन विणकर संस्थेकडून देण्यात येणार आहे असे अरविंद आसई यांनी सुचविले आहे. उत्पादीत होणारे टसर कोषाचे खरेदीसाठी संस्थामार्फत १० लाख कोष खरेदीचे नियोजन करण्यात आलेले आहे, या संस्थेमार्फत पवनी मध्ये कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन संस्था करित आहे.

Web Title: Threading demonstration program at Tusser Silk Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.