सिनेस्टाईल पाठलाग करुन ग्रामस्थांनी पकडले तीन आरोपी

By Admin | Published: August 1, 2015 12:09 AM2015-08-01T00:09:33+5:302015-08-01T00:09:33+5:30

टी.व्ही.चे प्रसारण सुरु असतांनी केबल कापून नेणाऱ्या एका टोळीला गावकऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले.

Three accused arrested by villagers by following the cinchail | सिनेस्टाईल पाठलाग करुन ग्रामस्थांनी पकडले तीन आरोपी

सिनेस्टाईल पाठलाग करुन ग्रामस्थांनी पकडले तीन आरोपी

googlenewsNext

डोंगरला शिवारातील घटना : केबल चोरांची टोळीचा संशय
तुमसर : टी.व्ही.चे प्रसारण सुरु असतांनी केबल कापून नेणाऱ्या एका टोळीला गावकऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डोंगरला शिवारात ही घटना घडली. तुमसर पोलिसांनी नाकाबंदी करून तिघांना अटक केली.
डोंगरला येथील विनोद बनकर यांचा केबल नेटवर्कचा व्यवसाय आहे. तुमसवरुन डोंगरला व त्यापुढील गावात केबल नेटवर्कींग आहे. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बनकर यांना एका ग्राहकाने भ्रमणध्वनीवर अचानक केबलचे प्रक्षेपण का बंद झाले अशी विचारणा केली. बनकर यांनी केबल प्रसारण सुरु आहे. तांत्रिक बिघाड झाले काय बघतो असे बोलून बनकर घराबाहेर सितेपार-डोंगरला शिवाराकडे निघाले. डोंगरला शिवारात रस्त्यालगत केबल तुटलेले दिसले. पुढे सितेपार गावाच्या फाट्यावर तीन युवक एक मोटारसायकल घेऊन उभे होते. बनकर यांनी तिघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बनकर यांनी मित्रांना मदतीसाठी बोलाविल्याची चाहूल लागताच तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी सिनेस्टॉईल पाठलाग करुन त्यांना पकडले.
यात आरोपी प्रितेश प्रेमदास धारगावे (२४) रा. शास्त्रीनगर भंडारा, गौरव सुनील भांडारकर (२५) लाल बहादूर शास्त्र वॉर्ड भंडारा व नबील इरशाद कुरैशी (२२) अंसारी वॉर्ड, भंडारा यांचा समावेश आहे. आरोपीकडून थ्रीकोअरचा १०० मीटर केबल, तथा केबल कापणारे कटर तुमसर पोलिंसानी हस्तगत केले. आरोपींवर ३७९ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.
केबल तथा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय असून भंडारा येथून तुमसर परिसरात हे तिघेही आले होते. येथे चोरीचे रॅकेट असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिघांनाही न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी लोकमतला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three accused arrested by villagers by following the cinchail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.