एक लाखांची लाच स्वीकारताना अभियांत्यासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:38 AM2023-02-17T10:38:07+5:302023-02-17T10:38:36+5:30

लाखांदूर नगरपंचायतचे प्रकरण : नागपूर एसीबीच्या पथकाची कारवाई

Three arrested including an engineer while accepting a bribe of one lakh | एक लाखांची लाच स्वीकारताना अभियांत्यासह तिघांना अटक

एक लाखांची लाच स्वीकारताना अभियांत्यासह तिघांना अटक

googlenewsNext

लाखांदूर (भंडारा) : शेताची मोक्का पाहनी करून विकास व छाणणी शुल्क पावती देणे, तसेच रेखांकन मंजुरीसाठी अंतीम शिफारस पुढे पाठविण्यासाठी १ लाख १० हजारांची लाच स्वीकारताना लाखांदूर नगरपंचायतीच्या अभियंत्यासह तिघांना अटक केली. ही कारवाई नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री केली.

स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड (२८), कनिष्ठ लिपीक विजय राजेश्वर करंडेकर (४०),  व खासगी वाहनचालक मुखरण लक्ष्मण देसाई (४५) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहे. लाखांदूर येथील तक्रारदाराच्या मालकीची शेती असून त्यांना  शेतीचे विकास व छाननी शुल्क पावती व रेखांकन मंजुरीसाठी शिफारस हवी होती. त्यांनी या कामासाठी लाखांदूर नगरपंचायतशी संपर्क साधला. काम करून देण्यासाठी १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार नागपुर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. गुरुवारी रात्री तब्बल १ लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मध्यरात्री सुमारास तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

Web Title: Three arrested including an engineer while accepting a bribe of one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.