तरूणाच्या खुनात तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:57 PM2019-01-21T22:57:42+5:302019-01-21T22:58:15+5:30
प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाचा टी-शर्टने गळा आवळून खून करणाऱ्या तीन आरोपींना साकोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. तालुक्यातील किन्ही येथे शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाचा टी-शर्टने गळा आवळून खून करणाऱ्या तीन आरोपींना साकोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. तालुक्यातील किन्ही येथे शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
रामेश्वर वालदे (४५), ममता वालदे (४०), मेघराज वालदे (२१) तिघे रा. किन्ही अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी प्रेमप्रकरणाच्या संशयातून गावातील अनिकेत अशोक बडोले (२२) याचा टी-शर्टने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. अनिकेत बडोले हा १८ जानेवारीपासून बेपत्ता होता.
दुसºया दिवशी त्याचा मृतदेह गावाशेजारील नाल्यावर आढळून आला. या घटनेने एकच खळबड उडाली. त्याचा कुणीतरी खून करून नाल्यात मृतदेह फेकल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे होते. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासात तीन आरोपींना अटक केली. आरोपींनी टी-शर्टने गळा आवळून खून केला. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत मृतदेह खांद्यावरून नाल्यात नेवून फेकला आणि ते पसार झाले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घानोडा येथून तिनही आरोपींना ताब्यात घेतले. अनिकेतचा खून नेमक्या कोणत्या कारणावरून झाला याचा शोध पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या तिघांच्या अटकेने या प्रकरणाचे रहस्य उलगडणार असून पोलीसांनी त्यांना न्यायालयापुढे हजर केले.
मृतदेहाची अवहेलना
अनिकेतचा मृतदेह नाल्याजवळ आढळल्यापासून शवविच्छेदन होईपर्यंत एकप्रकारे अवहेलनाच करण्यात आली. सुरूवातीला त्याचा मृतदेह येथील रुग्णालयात आणण्यात आला. मात्र तज्ज्ञांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करावयाचे असल्याने त्यासाठी विलंब झाला. तोपर्यंत नातेवाईक ताटकळत बसले होते.