कंत्राटदारांकडून मुख्यमंत्री सडक योजनेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 10:34 PM2018-06-03T22:34:36+5:302018-06-03T22:35:00+5:30
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१६-१७ संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर झाले असून या रस्त्यांचे काम वेगाने चालू आहे. माञ कंत्राटदारांकडून रस्ते बांधकामात घोळ केल्या जात आहे. कमी मटेरीयल वापरून, रुंदीकरणाच्या कामात घोळ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१६-१७ संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर झाले असून या रस्त्यांचे काम वेगाने चालू आहे. माञ कंत्राटदारांकडून रस्ते बांधकामात घोळ केल्या जात आहे. कमी मटेरीयल वापरून, रुंदीकरणाच्या कामात घोळ होत आहे.
तालुक्यातील पिंपळगाव/ को ते मडेघाट, कन्हाळगाव ते मेंढा/ चप्राड, रामा ३५४ ते सावरगाव, रामा ३५४ ते खैरी/पट, रामा ३५४ आसोला ते मांदेड, रामा ३५४ परसोडी/नाग ते कुडेगाव, रामा ३५४ ते रोहनी, दोनाड ते किरमटी, प्रजिमा ३९ घोडेझरी ते पालेपेंढरी, प्रजिमा ३८ सोनेगाव ते पेंढरी या रस्त्याचा समावेश आहे.
यातील रामा ३५४ ते खैरी/पट व रामा ३५४ रुपये कुडेगाव या कामात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. ह्या कामाच कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने मागिल दोन महिण्यापासुन कामाला सुरवात केली असून, मंद गतीने काम केले जात आहे. यामुळे रहदारीच्या नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी खुपच कमी प्रमाणात मटेरीयल वापरला जात आहे. कामात वापरलेला मुरूम निकृष्ठ दर्जाचा आहे.
रुंदीकरण व खोलीकरणातच घोळ होत असून पाच ते सहा इंचच खोलीकरण करुन अर्ध्या रस्त्याचे काम उरकुन टाकल्याने तसेच त्यामध्ये निकृष्ठ मुरूमाचा वापर केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबद माहिती दिली असता. काम दजेर्दार होईल ठेकेदाराला सांगतो असे बोलले होते. परंतु पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने रस्त्याच्या कामामध्ये तेरी भी चुप मेरी भी चुप असा पवित्रा बांधकाम विभागाने घेतल्याने काम दर्जेदार होणार का नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. आता संबंधित विभागाच्या अधिकाºयांना किंवा कंत्राटदार फोन केले असता. फोन उचलल्या जात नाही. रस्त्याचा विकास तर होत आहे परंतु दर्जेहीन व निकृष्ट कामाचा या रस्त्यावरुन दिसुन येत आहे. रस्त्यासाठी तिन कोटी रुपयांचा निधी आहे. यासंदर्भात अभियंता शुक्ला यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पुलाचे काम देखील निकृष्टच
डांबरीकरणाच्या कामासोबतच पुलाचे देखील काम चालु असून, या कामात देखील कमी सिमेंन्ट वापरून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. आतमधिल काम कमी मटेरीयल वापरून मातीचा भरणा करून वरून सिमेंटचे प्लास्टर केले जात आहे.
मुरूमाचे वाजवीपेक्षा अधिक खनन
पिपळगाव/को. मार्गावरील तलावातुन सद्या स्थितीत मुरूमाचे उत्खनन चालू असून, येथुन परीसरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची वाहतूक केली जात आहे. होत असलेला मुरूम उत्खनन राजरोसपणे जेसीबीच्या साहाय्याने एकाच राँयल्टीवरून १० ते १५ ट्रॅक्टर मुरूमाची वाहतूक केली जात आहे. एवढेच नाही तर रॉयल्टीवर खोडतोड करून चोरटी वाहतूक होत असल्याने महसुल पाण्यात बुडत आहे.
कामावरील मटेरीयल लोकांच्या घशात
खैरी/पट येथे सुरू असलेल्या कामावरील सिमेंन्ट व गिट्टी गावातील एका व्यक्तीने चक्क स्वत:च्या घरी नेले असून, खुद्द ठेकेदारांनेच दिले असल्याचे सांगितले जाते आहे. या ठिकाणी साठ मिटर नाली बांधकाम होत असतांना ग्रामस्थांनी विस मिटर अधिक नाली बांधकाम करून मागितले असता, जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले. माञ साठच मिटर बांधकाम करून मटेरीयल संपल्याचे सांगण्यात आले आहे.
होत असलेल्या रस्त्याचे काम खुपच निकृष्ट दजार्चे असून, संबंधित विभाग व ठेकेदाराकडून मनमानी केली जात आहे.
- वामन नखाते,
उपसरपंच ग्रा.पं.खैरी/पट