गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:15 AM2017-07-18T00:15:44+5:302017-07-18T00:15:44+5:30

मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली आहे.

Three doors of Gosekhudd Dam open half a meter | गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडले

गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडले

googlenewsNext

धरणस्थळी पर्यटकांची गर्दी : -तर रोजगाराला मिळू शकतो वाव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली आहे. परिणामी गोसेखुर्द धरणाचे तीन वक्रद्वारे अर्धा मिटरने उघडण्यात आली असून १० हजार ६६५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
भंडारा जिल्ह्यात अपेक्षेनुरुप अजूनपर्यंत पाऊस बरसलेला नाही. काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे धान पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाची पाण्याची पातळी २४४ मीटरवर पोहोचली आहे. मध्यप्रदेश सीमावर्ती भागात व वैनगंगा नदीच्या पात्रात पाऊस बरसल्याने नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली दिसून येत आहे.
परिणामी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आली आहे. सध्या वैनगंगा नदीच्या कारधा नदीपात्रात १२ फूट जलसाठा आहे. संजय सरोवराच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी वैनगंगेत सोडण्यात आले.
दुसरीकडे धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे जिल्हाभरातून पर्यटक भेट देत आहेत. परिणामी क्षेत्रातील रोजगारालाही चालना मिळत आहे.

पावसाची टक्केवारी
जिल्ह्यात १ जून ते १७ जुलैपर्यंत बरसलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ५७ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४८.४ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १३३० मि.मी. पाऊस बरसतो. मागील ४७ दिवसात तालुकानिहाय नोंदीत भंडारा तालुक्यात २४५.३ मि.मी., मोहाडी १८९.१, तुमसर २३५.८, पवनी १९४.५, साकोली २५८.८, लाखांदूर २४४.६ तर लाखनी तालुक्यात ३७०.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सातही तालुक्यात बरसलेल्या एकूण पावसाची नोंद १७३८.९ मि.मी. करण्यात आली असून त्याची सरासरी २४८.४ मि.मी. इतकी आहे.

Web Title: Three doors of Gosekhudd Dam open half a meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.