आगीत तीन घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:25 PM2018-01-25T23:25:06+5:302018-01-25T23:25:29+5:30
गोठ्यात ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागल्यामुळे तीन घरांना आग लागली. यात शेती उपयोगी अवजारे, लाकडी फाटे जळून खाक झाली. अग्निशमन वाहन वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना तुमसर तालुक्यातील खापा (तुमसर) येथे गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गोठ्यात ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागल्यामुळे तीन घरांना आग लागली. यात शेती उपयोगी अवजारे, लाकडी फाटे जळून खाक झाली. अग्निशमन वाहन वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना तुमसर तालुक्यातील खापा (तुमसर) येथे गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
दिगंबर नत्थू ठवकर रा.खापा यांनी दोन दिवसांपूर्वी घरातील गोठ्यात तणीस भरली होती. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने तणसीने पेट घेतला. शेजारच्या दलपत ठवकर व सुनिल ठवकर यांच्या घरातील लाकूड फाटे आगीत खाक झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारचे नागरिक मदतीसाठी धावून आले. तुमसर नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. तरीसुद्धा या आगीत सुमारे १ लाख २५ हजारांचे नुकसान झाले. दरम्यान माजी जि.प.सदस्य विठ्ठल कहालकर, सरपंच योगेश हलमारे, उपसरपंच कवळू ठवकर, बालकदास ठवकर, तलाठी रंगारी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्यात मदत केली. शॉर्टसर्कीटमुळे तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.