बोदरा येथे तीन शिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:32 PM2018-08-01T22:32:53+5:302018-08-01T22:33:27+5:30
तालुक्यात शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या रोडावत आहे. साकोली तालुक्यातील बोदरा येथे बुधवारी पहाटे वीज प्रवाहाच्या सहाय्याने एका रानडुकराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उईके यांनी सापळा रचून तीन शिकाऱ्यांना जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यात शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या रोडावत आहे. साकोली तालुक्यातील बोदरा येथे बुधवारी पहाटे वीज प्रवाहाच्या सहाय्याने एका रानडुकराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उईके यांनी सापळा रचून तीन शिकाऱ्यांना जेरबंद केले.
दशरथ संपत भोंडे (४५), देवराम भिवाजी चांदेकर (५९), भागवत कडू मेश्राम (४६) तिघेही रा.बोधरा अशी अटकेतील शिकाºयांची नावे आहेत. लाखनी वन विभागाअंतर्गत साकोली तालुक्यातील बोधरा येथे तिघांनी जंगलाजवळ नाल्यावर वीज प्रवाह लावून एका रानडुकराची शिकार केली. शिकारीनंतर सदर रानडुकराच्या मांसाची त्याच ठिकाणी विक्री करण्यात आली काही मांस शिकाºयाने स्वत:साठी घरी घेऊन गेले. या शिकारीची माहिती वनक्षेत्राधिकारी आरती उईके यांना मिळाली. यांनी तात्काळ या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. अवघ्या काही तासातच शिकाºयांना पकडून त्यांना वनकार्यालय साकोली येथे आणून कायदेशिर कारवाई केली.
पकडण्यात आलेल्या शिकाऱ्यांजवळ रानडुकराचे मांस, शिकारीसाठी लागणारे साहित्य व शिजविण्यासाठी वापरण्यात आलेले भांडे असे साहित्य जप्त करण्यात आले. वनविभागाने पकडलेल्या धाडीत मात्र रानडुकराचे शीर सापडलेले नाही. मात्र सदर मांस हे रान डुकराचेच आहे हे पशुवैद्यकीय अधिकाºयांकडूच निश्चित करण्यात आले. सदर कारवाई वनक्षेत्राकिारी आरती उईके, क्षेत्र सहाय्यक वाय.एस. तांडेकर, वनरक्षक एन.एस. हटवार, आर.बी. पडोळे, क्षेत्र सहाय्यक आर.बी. धोटे, वनपाल आर.एस. साखरे, के.एम. जांभुळकर, वनरक्षक बी.एम. बोपचे, वनमजूर जी.एस. तुपट, डब्लू.एन. बोळणे, धारणे, वाहन चालक डी.जी. धोंडे यांनी केली आहे.