चार घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 12:17 AM2016-06-20T00:17:02+5:302016-06-20T00:17:02+5:30

शनिवार व रविवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी काळा दिवस ठरला. चार घटनांमध्ये तिघांचा मृत्यू तर एक विवाहिता मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावली.

Three killed in four incidents | चार घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

चार घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

Next

२४ तासातील थरारक घटना : विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न, तुमसरात पोलिसाचा मृत्यू, सोनेगावात आढळला तरुणाचा मृतदेह
भंडारा : शनिवार व रविवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी काळा दिवस ठरला. चार घटनांमध्ये तिघांचा मृत्यू तर एक विवाहिता मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावली. वरठी येथे महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. चुल्हाड परिसरातील सोनेगाव जंगलात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. तुमसरात घडलेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कवडशी फाट्यावर एका ट्रॅक्टरमालकाचा ट्रॅक्टरखाली दबून अंत झाला.
दुचाकीला धडक; पोलिसाचा मृत्यू
तुमसर : कर्तव्यावर जाणाऱ्या एका पोलिसाच्या दुचाकीला रानडुकराने जोरदार धडक दिली. यात पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागपूर येथे उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ब्रिजमोहन सिताराम कटरे (५०) रा. तुमसर असे मृतकाचे आहे.
हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजता मिटेवानी - साखळी शिवारात घडला. कटरे हे तुमसरहून गोबरवाही पोलीस ठाण्यात कर्तव्यावर दुचाकी एम एच ३६जे-५२८५ निघाले. मिटेवानी-साखळी शिवारात रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
कटरे हे रस्त्यावर डोक्याचा भारावर पडले. डोक्याला गंभीर इजा झाली. नागरिकांनी त्यांना प्रथम तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. भंडारा येथे एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्यानंतर त्यांना नागपूर येथे ‘रेफर’ करण्यात आले. नागपूर येथे उपचाराकरिता नेत असताना त्यांचा जवाहरनगरजवळ मृत्यू झाला.
ब्रिजमोहन कटरे हे गोबरवाही येथे पोलीस विभागात वाहन चालक पदावर कर्तव्यावर होते. मनमिळावू व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूमुळे गोबरवाही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

सोनेगाव जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह
चुल्हाड (सिहोरा) : ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा घनदाट जंगल असलेल्या सोनेगाव शिवारात एका २५ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली. याच जंगलात एका तरुणीचाही मृतदेह असल्याची चर्चा होती. मात्र वृत्त लिहेपर्यंत या चर्चेला पूर्णविराम मिळालेला नव्हता. सोनेगाव जंगल शिवारात कंपार्टमेंट नं. ७१ मध्ये एका तरुणाचा मृतदेह असल्याची चर्चा गावात सुरु होती. माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह पुर्णत: कुजलेल्या अवस्थेत होता. तरुणाने स्वत:चा शर्टने गळफास घेतल्याचे घटनास्थळावर प्राथमिक तपासात दिसून आले. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. तरुणाचा मृत्यू हा नैसर्गिक आत्महत्या नसून घातपाताची शक्यता असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे, ‘आॅनर किलिंग’चा प्रकार असल्याचेही गाव परिसरात चर्चा आहे. दरम्यान या मृतकाची ओळख पटू शकलेली नाही. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे करीत आहेत. या घटनेमुळे मात्र सिहोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न
वरठी : पोटगीची रक्कम न भरल्यामुळे एका इसमास तुरुंगाची हवा खावी लागली. पत्नीने पोटगीचा दावा केल्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आलेल्या पती व त्याच्या कुटुंबीयाने वचपा काढण्यासाठी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी वरठी येथील नेहरु वॉर्डात ही घटना घडली. नेहरु वॉर्डातील रहिवासी साधना नाईक ही महिला मुलगी संजना व मुलगा यांच्यासह पतीपासून वेगळी राहते. साधनाने तिचा पती सोनु हेमराज नाईक याच्याविरुध्द पोटगीकरिता न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार पीडित महिलेला १ लक्ष ४७ हजार रुपये देण्याचा आदेश झाला होता. वेळेच्या आत पैसे न भरल्यामुळे सोने नाईक याला ४० दिवस तुरुंगाची हवा खावी लागली. नुकताच तुरुंगातून सुटका झाल्यानंतर याने पत्नीसोबत भांडण करने सुरु केले होते. दरम्यान, १६ जून रोजी सायंकाळी याच कारणावरुन भांडण झाले. वादातून विवाहितेवर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेच्या वेळी सासू, सासरे, नणंद व तिचा पतीने घरात शिरुन विवाहितेला मारहाण केली. विवाहितेची नणंद शीतलने रॉकेलची कॅन आणून सोनू नाईक याच्या हातात दिली. सोनूने विवाहितेचा अंगावर रॉकेल ओतले आणि आगीची काडी उगारली. तेवढ्यात मुलगा बाहेरुन येताच आईसोबत घडलेला प्रकार दिसला. त्याने संघर्षातून आईची सुटका केली. फिर्यादी साधना नाईक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन सोनूला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत करीत असून उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. (वार्ताहर)

Web Title: Three killed in four incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.