ट्रॅव्हल्स-मॅक्स वाहनाच्या धडकेत तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:56 PM2018-04-01T22:56:36+5:302018-04-01T22:57:16+5:30

Three killed in traffic jams | ट्रॅव्हल्स-मॅक्स वाहनाच्या धडकेत तीन ठार

ट्रॅव्हल्स-मॅक्स वाहनाच्या धडकेत तीन ठार

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ प्रवासी गंभीर जखमी : मिटेवानी-मेहगाव शिवारातील घटना, जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ट्रॅव्हल्स व मॅक्स वाहनात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मॅक्सचालकासह तीन जण ठार झाले. ही घटना मिटेवानी- मेहगाव दरम्यानच्या वळणावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश चौधरी (४२) (मॅक्सचालक) रा.डोंगरी बु., प्रवासी कुसुम पृथ्वीराम सरोदे (५६) रा.कुरमुडा व प्रकाश गोन्नाडे (३३) रा.पवनारा अशी मृतांची नावे आहेत. ओव्हरटेक करताना ही घटना असून यात १३ प्रवासी गंभीर जखमी झाले.
तिरोडी येथील वऱ्हाडी तुमसर येथे मुस्लीम समुदायातील सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त मॅक्स क्रमांक एम.एच. ३१ ए.एच. ४१९३ ने येत होते. विरुद्ध दिेशेने जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.पी. ५० बी ०२१८ तिरोडी येथे जात होती. मिटेवानी - मेहगाव वळणावर एका कमांडरला ओव्हरटेक करताना प्रवासी मॅक्स व ट्रॅव्हल्स यांच्यात आमोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की मॅक्स सुमारे ४०० फूटांपर्यंत फरफटत गेली. धडकेत ट्रॅव्हल्स अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात ट्रॅव्हल्समधील प्रवाशी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी प्रवाशांमध्ये ग्यानीराब बर्वे (७०) रा.बाळापूर, कमला पुष्पतोडे (५०) कुरमुडा, सुमत्रा बर्वे (४५) रा.बाळापूर, गायत्री धनराज मलघाटी (४५), रा.बाळापूर, रिता शाहू (४)रायपूर (छत्तीसगड) यांना भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.उर्वरीत जखमी हलीमा बी. (७०) तिरोडी, सैय्यदा बी (७५) रा.तिरोडी, हसीना पठाण (४०) रा.गोंदिया, दिलीप उके (३०) रा.तिरोडी, भोजराज गुर्वे (४८) रा.बळपाणी, शकीला खान (४०) तिरोडी, अजीजा बी (६५) रा.तिरोडा, रिजवाना शेख (३०) तिरोडी यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघातानंतर जि.प.चे माजी सदस्य सुरेश राहांगडाले यांच्यासह सरपंच तथा तुमसर येथून मुस्लिम समाजबांधवांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तुमसर येथे उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक म्हैसकर करीत आहे.तुमसर नाकाडोंगरीसह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भरधाव वाहनामुळे अपघात येथे घडत आहेत. दोन दिवसापूर्वीच खापा चौकात टिप्परने एका तरूणाचा जीव घेतला.

Web Title: Three killed in traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.