खरबीत तीन लाखांची दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:00 AM2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:26+5:30

पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे  सहाय्यक फौजदार शेंडे,  सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाशिव निंबाळकर (३९), दुसरी  गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए.एम. चे चालक अभय बाबुराव बनपूरकर (४५), व आशिष भाऊराव बडवाईक (३०)   सर्व राहणार चंद्रपूर यांच्या वाहनातून  दारू वाहतूक करताना आढळले.

Three lakh liquor seized | खरबीत तीन लाखांची दारु जप्त

खरबीत तीन लाखांची दारु जप्त

Next
ठळक मुद्देजवाहरनगर पाेलिसांची कारवाई

  लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहर नगर  :  भंडाराहुन  चंद्रपूरला दोन चारचाकी वाहन जात असताना, खरबी नाका येथे पेट्रोलियम दरम्यान वाहन थांबवून झडती घेतली. यात दारूची अवैध वाहतूक करताना आढळले. यावेळी चार जणांना अटक करुन दारु साठा जप्त करण्यात आला. सदर साहित्याची किंमत दोन लक्ष ७२ हजार ३२० रुपये आहे. 
पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे  सहाय्यक फौजदार शेंडे,  सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाशिव निंबाळकर (३९), दुसरी  गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए.एम. चे चालक अभय बाबुराव बनपूरकर (४५), व आशिष भाऊराव बडवाईक (३०)   सर्व राहणार चंद्रपूर यांच्या वाहनातून  दारू वाहतूक करताना आढळले. चाैकशी केली असता विना परवाना दारुची वाहतूक केल्या जात असल्याचे आढळून आले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे,  सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे यांनी पोलीस निरीक्षक एस बी ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.फिर्यादी गिरीश राणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस हवालदार मिलिंद जनबंधू व सहकारी करीत आहे.

Web Title: Three lakh liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.