पशू चिकित्सालयातील तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:41+5:302021-05-22T04:32:41+5:30
▪ तालुका लघु पशू चिकित्सालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पद रिक्त पाळीव जनावरांवर उपचार होईना लाखांदूर : शासन, प्रशासनासह स्थानिक जनप्रतिनिधींच्या ...
▪ तालुका लघु पशू चिकित्सालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पद रिक्त
पाळीव जनावरांवर उपचार होईना
लाखांदूर : शासन, प्रशासनासह स्थानिक जनप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षाने गत ४ वर्षांपासून स्थानिक लाखांदूर येथील लघु पशू चिकित्सालयातील तब्बल ३ प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नसल्याने तालुक्यातील पशुपालक शेतकरी व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर स्थितीत गत ४ वर्षांपासून सदर पशू चिकित्सालयातील चपराशाद्वारे प्राण्यांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे.
लाखांदूर येथे गत काही वर्षांपूर्वी लघु पशू चिकित्सालय दवाखान्याची निर्मिती केली गेली. या दवाखान्यांतर्गत तालुक्यातील लाखांदूर, किन्हाळा, पिंपळगाव को., सावरगाव, खैरी /पट, चिचोली व दहेगाव आदी गावांतील शेतकरी व नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. या दवाखान्यांतर्गत शेतकरी व नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर उपचार करण्याहेतू ५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांत सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, ड्रेसर, लिपिक व चपराशी यांचा समावेश आहे.
मात्र, गत ४ वर्षांपासून येथील लघु पशू चिकित्सालयातील लिपिक व चपराशी या पदाव्यतिरिक्त उर्वरित पदे भरण्यात न आल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर स्थितीत परिसरातील पाळीव पशू पालकांद्वारे उपचारार्थ प्राण्यांवर येथील चपराशाद्वारे उपचार केला जात आहे. परिसरातील पशुपालक नागरिकांना उपचाराअभावी परतल्याचेदेखील सांगण्यात आले. शासन, प्रशासनाने दखल घेत पाळीव प्राण्यांवर उपचार होण्याहेतू रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी परिसरातील पशुपालक व नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
210521\img-20210521-wa0029.jpg
===Caption===
लाखांदुर येथील लघु पशु चिकीत्सालयाची ईमारत