Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हयात तीन जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:25 PM2020-05-24T12:25:26+5:302020-05-24T12:25:50+5:30
भंडारा जिल्हयातील अजून तिघांचे नमुने रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यात साकोली तालुकयातील ऊसगाव, पवनी तालुकयातील भुयार तर लाखांदूर तालुकयातील एका व्यकतीचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कारोनाबाधितांची संख्या १२ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हयातील अजून तिघांचे नमुने रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यात साकोली तालुकयातील ऊसगाव, पवनी तालुकयातील भुयार तर लाखांदूर तालुकयातील एका व्यकतीचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कारोनाबाधितांची संख्या १२ झाली आहे.
लाखांदूर तालुक्यातील एक व्यक्ती १५ मे रोजी पुण्याहून लाखांदूर येथे पोहोचला. त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. नमूना घेतल्यानंतर २३ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण ३० व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील ३२ वर्षीय तरूण मुंबई येथून आला होता. साकोलीत यापूर्वी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा व्यक्ती सुद्धा त्यांचा सोबतीला होता. त्याला साकोली येथील संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे. तिसरा रूग्ण पवनी तालुक्यातील भुयार येथील असून तो १८ मे रोजी मुंबईहून गावात पोहोचला. १९ तारखेला नमुना घेतल्यानंतर काल शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.