जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह, एक कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:39+5:302021-08-27T04:38:39+5:30
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तुरळक एक दोन रुग्ण आढळत होते. मात्र सोमवारी जिल्ह्यात डेल्टाप्लस ...
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तुरळक एक दोन रुग्ण आढळत होते. मात्र सोमवारी जिल्ह्यात डेल्टाप्लस व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला. सुदैवाने हा रुग्ण ठणठणीत बराही झाला आहे. मात्र सोमवारपासून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात एकट्या भंडारा तालुक्यात तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या आठ ॲक्टिव्ह रुग्ण असून भंडारा तालुक्यात पाच, लाखनी दोन आणि साकोली तालुक्यात एक रुग्ण आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार ८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ५८ हजार ९४२ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. तर ११३३ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.
बॉक्स
आतापर्यंत ५८ हजार ९४२ कोरोनामुक्त
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार ९४२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार ४६०, मोहाडी ४३१७, तुमसर ७०९२, पवनी ५९९०, लाखनी ६५६०, साकोली ७६२३, लाखांदूर २९०० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.