गोंडवाना एक्स्प्रेस रेल्वेत लूटमार करणारे तीन लुटारू जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:30 PM2022-11-15T23:30:23+5:302022-11-15T23:34:44+5:30
१२ नोव्हेंबर रोजी तुमसर ते तिरोडा दरम्यान धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये तीन लुटारूंनी प्रवेश केला. पेट्री कारमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्या जवळून ७० हजारांची लूटमार करून पसार झाले. या घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने रेल्वे पोलिसअंतर्गत कलम ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये शिरून लूटमार करणाऱ्या तीन लुटारूंना रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. लुटमारीची ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड ते तिरोडा या रेल्वे स्थानकादरम्यान १२ नोव्हेंबर रोजी घडली होती. लुटारुंनी चेन पुलिंग करून रेल्वे थांबविली आणि पसार झाले होते.
अरविंद सुजन सिकरवार (२४), रा. गलैथा जि. मुरैना, मोहन शंकरसिंह तोमर (२१) रा. पोरस जि. मुरैना, रवीसिंहग महावीर सिंग (२५) रा. फुलावली जि. भिंड अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत. १२ नोव्हेंबर रोजी तुमसर ते तिरोडा दरम्यान धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये तीन लुटारूंनी प्रवेश केला. पेट्री कारमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्या जवळून ७० हजारांची लूटमार करून पसार झाले. या घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने रेल्वे पोलिसअंतर्गत कलम ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. लुटारूंना अटक करण्यासाठी नागपूरचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले. त्यांनी लुटारूंना मोठ्या शिताफीने सोमवारी नागपूर परिसरातून रात्री अटक केली.
ही कारवाई निरीक्षक एस. दत्ता, निरीक्षक व्ही. के. तिवारी, उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन, उपनिरीक्षक आर्. ए. बनसोड, आरक्षक जयंतीलाल, निरीक्षक अनिल पाटील, निरीक्षक नंदबहादुर गोंदिया यांच्या पथकाने केली. त्यांनी आणखी कुठे असे लुटमारीचे प्रकार केले काय, याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे.
गाडीची चेन ओढून लुटारू झाले पसार
- तीन लुटारूंनी पेन्ट्री कारमध्ये लुटमार केल्यानंतर पळून जाण्यासाठी चेन पुलिंग केले. तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ रेल्वे थांबताच तिनही लुटारू पसार झाले. धावत्या रेल्वेत लुटमार करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना असावी.