लांडग्याच्या हल्ल्यात तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:20 PM2018-10-05T22:20:07+5:302018-10-05T22:20:28+5:30

शेतात काम करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील पिंडकेपार येथे शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लांडग्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

Three serious in wolf attack | लांडग्याच्या हल्ल्यात तीन गंभीर

लांडग्याच्या हल्ल्यात तीन गंभीर

Next
ठळक मुद्देपिंडकेपारची घटना : साकोली तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शेतात काम करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील पिंडकेपार येथे शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लांडग्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
शिलाबाई दामोधर उके (४०), सरस्वती बाळकृष्ण गजबे (६०), खेमराज सुखराम मडावी (२५) तिघे रा. पिंडकेपार अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी तिघेही जण शेतात काम करीत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या लांडग्याने शिलाबाईवर अचानक हल्ला केला. त्यामुळे तिने आरडा ओरडा करताच बाजुच्या शेतात काम करीत असलेले खेमराज आणि सरस्वती दोघेही मदतीसाठी धावून आले. मात्र या लांडग्याने त्या दोघावरही हल्ला केला. हा प्रकार इतर शेतकºयांना माहित होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी भंडारा येथे रवाना करण्यात आले.
गुरूवारी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना घडली होती. शुक्रवारी पुन्हा लांडग्याने हल्ला केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात जाण्यास मजूर आणि शेतकरीही घाबरत आहे. सध्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात तळ ठोकून आहे. मात्र लांडग्याची दहशत आहे. लांडग्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Web Title: Three serious in wolf attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.