तीन हजार रूग्णांना मिळाले अभयदान
By admin | Published: November 24, 2015 12:36 AM2015-11-24T00:36:23+5:302015-11-24T00:36:23+5:30
जिल्ह्यात जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षात २,९७८ रूग्णांनी लाभ घेतला असून यासाठी राज्य शासनामार्फत ८ कोटी ६० लाख ५१ हजार ९४० रूपये मंजूर करण्यात आले होते.
जीवनदायी आरोग्य योजना : २० हजार रूग्णांची तपासणी
भंडारा : जिल्ह्यात जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षात २,९७८ रूग्णांनी लाभ घेतला असून यासाठी राज्य शासनामार्फत ८ कोटी ६० लाख ५१ हजार ९४० रूपये मंजूर करण्यात आले होते.
भंडारा जिल्ह्यात नोंदणीकृत रूग्णालयाव्दारे गरजु रूग्णांची मोफत तपासणी करण्याकरिता ५५ आरोग्य शिबिर घेण्यात आली. यामध्ये २० हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली असून पात्र असलेल्या रूग्णांना पुढील सेवेकरिता संबंधित रूग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला २१ नोव्हेंबर २०१३ पासून प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशी कुटूंबे किंवा ज्या कुटूंबाकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
त्यांना निवडक ९७१ शस्त्रक्रीया व वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कक्ष सुरू करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)