तहसील कार्यालयातून पळविलेले तीन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:32+5:302021-07-22T04:22:32+5:30

ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३५-एजे ११७९, ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३५- एजे ११७९ ट्रॉलीसह तसेच एक विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त ...

Three tractors stolen from tehsil office seized | तहसील कार्यालयातून पळविलेले तीन ट्रॅक्टर जप्त

तहसील कार्यालयातून पळविलेले तीन ट्रॅक्टर जप्त

Next

ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३५-एजे ११७९, ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३५- एजे ११७९ ट्रॉलीसह तसेच एक विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करून नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ठेवण्यात आले होते. या तिन्ही ट्रॅक्टरसंदर्भात शहर पोलिसांत भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे ट्रॅक्टर मुकेश यादोराव बिसेन (३६, रा. रामनगर) व आरोपी लोकेश डेनीराम पाचे (२२,रा. सुकळी, बालाघाट), दीपक ऊर्फ बटन बंडू मरसकोल्हे (रा. तेढवा) यांनी शुक्रवारी (दि.१६) पळविले होते. यावर पोलिसांनी त्यांना सोमवारी (दि.१९) अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत (दि.२१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किंमत नऊ लाख रुपये सांगितली जाते. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार मिश्रा, पोलीस नायक मेहर, पोलीस नायक शेख, पोलीस नायक तुरकर, पोलीस शिपाई रहांगडाले, केदार, मानकर, जागेश्वर उईके, शेंडे, एस. बिसेन, मेश्राम, चव्हाण, वाय. बिसेन, रहांगडाले, छगन विठ्ठले यांनी केली आहे.

Web Title: Three tractors stolen from tehsil office seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.