अवैध दारू विक्रेत्याला तीन वर्ष कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:55 PM2018-12-14T22:55:40+5:302018-12-14T22:55:59+5:30
देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्याला लाखांदूर येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी तीन वर्ष कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्याला लाखांदूर येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाºयांनी तीन वर्ष कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
किसन तुळशीराम नाकतोडे (६७) रा. कुडेगाव तालुका लाखांदूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कुडेगाव येथे देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस शिपाई सतीश गिरीपुंजे याने २९ आॅगस्ट २०१६ रोजी धाड मारून किसन नाकतोडे यांच्याजवळून देशी दारू जप्त केली.
त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास करून प्रकरण लाखांदूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाºयांच्या न्यायालयात दाखल केले. याठिकाणी सहायक सरकारी वकील यु.व्ही. समरीत यांनी सरकारपक्षाची बाजू मांडली. गुन्ह्याचे स्वरूप व गंभीरता लक्षात घेवून न्या. एस.ए. सुरजुसे यांनी आरोपी किसन नाकतोडे याला तीन वर्ष साधा कारावास व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्यात लाखांदूरचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात नितीन साठवणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.