तीन वर्षापासून सिलिंडरची सबसिडी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:27 AM2018-12-19T01:27:54+5:302018-12-19T01:28:07+5:30
बँक खात्याशी आधार कार्ड ही जोडले असतांना गत तिन वर्षापासून तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मागासवर्गीय लाभार्थांची गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बँक खात्याशी आधार कार्ड ही जोडले असतांना गत तिन वर्षापासून तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मागासवर्गीय लाभार्थांची गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वनाचे रक्षण व्हावे या करिता नाकाडोंगरी वनविभाग अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती तर्फे नाकाडोंगरी येथील मागासवर्गातील अनुसूचित जातीच्या महिला पुरुष लाभार्थांना अनुदानातून गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले होते.
थेट लाभाअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी ही खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थांचे आधार लिंक होने ही गरजेचे असल्याने लाभार्थांनी बँक खात्याशी आधार लिंक ही केले. परंतु मागील तिन वर्षापासून गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा होत नसल्याने नाकाडोंगरी येथील मागासवर्गियांनी अतिमागास बनविण्याचा प्र्रकार होत आहे.
गॅस सिलेंडरवरील सबसिडीचे संपूर्ण पैसे व्याजासह मिळावे याकरिता नाकाडोंगरी येथील मागासवर्गिय लाभार्थी तालुका पुरवठा अधिकाऱ्याला भेटून निवेदन सोपविले. सदर मागणीचे निवेदन तालुका पुरवठा अधिकारी पल्लवी मोहाडीकर यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी रजनी राजकुमार घडले, पौर्णिमा दहाट, संजु पारधी, इंदू डोंगरे, अर्चना डोंगरे, मधुमाला डोंगरे, स्नेहा दहाट, राधा दहाट, विना डोंगरे, अंजु उके, वर्षा वासनिक, केशर बोरकर, उषा बोरकर, प्रदिप पारधी, पवन पारधी, राजानंद बोरकर, अर्जुन रामटेके, मिना दहाट, शकुंतला उके आदी उपस्थित होत्या.