वॉटर मॅराथान स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

By admin | Published: March 21, 2016 12:30 AM2016-03-21T00:30:25+5:302016-03-21T00:30:25+5:30

जलजागृती सप्ताहानिमित्त प्रत्येक गावापर्यंत पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी आज सकाळी शहरातील बहिरंगेश्वर व्यायाम शाळा...

A thrilling response to the water marathon competition | वॉटर मॅराथान स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

वॉटर मॅराथान स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

Next

आमदारांच्या हस्ते शुभारंभ : समीर बोरकर, श्रद्धा हलमारे आणि हेमंत पवनकर, कीर्ती येळणे अव्वल
भंडारा : जलजागृती सप्ताहानिमित्त प्रत्येक गावापर्यंत पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी आज सकाळी शहरातील बहिरंगेश्वर व्यायाम शाळा खामतलाव येथून वॉटर मॅराथान स्पर्धेला सुरुवात झाली. या मॅराथानला आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
यावेळी कार्यकारी अभियंता मेंढे, गोसे उपसा सिंचन आंबाडी काळे, वाही विभागाचे शेंडगे, अन्वेकर, कार्यकारी अभियंता पद्माकर पाटील, सोनाली चोपडे, वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थित होत्या.
१७, १९ व २५ वर्षाखालील वॉटर मॅराथान स्पर्धा नेमून दिलेल्या मार्गानी सुरु झाल्या. या वॉटर मॅराथान स्पर्धेत भंडारावासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. जलजागृती सप्ताहानिमित्त पाण्याची बचतीचे महत्व नागरिकांना पटवून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धक विशेष पोषाखात सकाळच्या उत्साहाच्या वातावरणात सहभागी झाले होते. १७ वर्ष वयोगटातील प्रथम पुरस्कार समीर बोरकर व श्रद्धा हलमारे, द्वितीय पुरस्कार अजय भगत, कल्याणी करवाडे व तृतीय पुरस्कार कृषीकेश हटवार व प्राची दमाहे, चतुर्थ पुरस्कार गौरव भुरे व सायली मते तर १९ वर्ष वयोगटातील प्रथम पुरस्कार हेमंत पवनकर व कीर्ती येळणे, द्वितीय पुरस्कार समीर खान व साक्षी उराडे, तृतीय पुरस्कार अर फान बेग मिर्झा व कृतीका डुंभरे, चुतर्थ भाग्यश्री केळझरकर, २५ वर्ष वयोगटातील प्रथम पुरस्कार जागेश्वर चौधरी व प्रियंका डोये, द्वितीय पुरस्कार चंद्रशेखर ढेंगे व करिश्मा डोये, तृतीय पुरस्कार मयूर सूर्यवंशी व स्नेहा गिऱ्हेपुंजे, चतुर्थ पुरस्कार विकास समरीत व स्नेहा मानापुरे वॉटर मॅराथानचे मानकरी ठरले. २२ मार्च रोजी समारोपीय कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम पुरस्कार १,५०० रुपये, द्वितीय पुरस्कार १,००० रुपये, तृतीय पुरस्कार ७५० रुपये आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल. या कार्यक्रमात जलसंपदा, लघुपाटबंधारे, क्रीडा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: A thrilling response to the water marathon competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.