कबड्डीमुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:18 AM2018-12-19T01:18:06+5:302018-12-19T01:21:01+5:30
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. कबड्डी खेळ हा जागतिक पातळीवर पोहोचला असून मैदानात मैदानी खेळ खेळल्याने एक वेगळा आनंद मिळत असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा): महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. कबड्डी खेळ हा जागतिक पातळीवर पोहोचला असून मैदानात मैदानी खेळ खेळल्याने एक वेगळा आनंद मिळत असतो. कबड्डी या खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संदिप ताले यांनी केले.
न्यु सेव्हन स्टार क्रिडा मंडल लोहारा व समस्त ग्रामवासी यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक नत्थू बांडेबुचे यांच्या शेतातील पटांगणात आयोजित एक दिवसीय कबड्डी खेळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे सरपंच नरेन्द्र कुंभरे, मग्रारोयो समिती सदस्य अनिल बांडेबुचे, माजी उपसरपंच गुलाब पिलारे, नितिन बांडेबुचे, महादेव देवगडे, राजा बांडेबुचे, तरुण साधवाणी, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश लेदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर ढोरे, मारोती दुपारे, मानिक भर्रे, दिलीप ढोंगे, मुकेश पिलारे होते. तर नितेश ब्रम्हलुटे, मोरेश्वर डोणारकर, पुरणदास तुपटे, चंद्रशेखर बांडेबुचे, सुर्यभान माकडे, धनराज तुपटे, पिरम मरस्कोल्हे, आशिष ढोमणे, भोजराम देवगडे, गुलाब किटे, युवराज लेदे, फुलन माकडे, रामरती नेवारे, कांता इळपाचे, द्वारकेश पिसारे, प्रशांत माकडे, विलास गोडबोले, अमोल नेवारे, अक्षय नेवारे, अमोल माकडे, श्रीकांत ढोरे, सुदिप पिल्हारे, अमित बुराडे, विलास अतकरी, श्रीकांत माकडे, तेजस बांडेबुचे, चेतन नेवारे, अतुल राऊ त तसेच गावकरी व खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.
एक दिवसीय कबड्डी खेळाला नागरिकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळाला.
विजेत्या संघाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिनकर मोहतुरे यांनी तर आभार प्रदर्शन द्वारकेश पिल्हारे यांनी केले. कार्यक्रमासाठी अक्षय नेवारे, विलास गोडबोले, प्रशांत माकडे, श्रीकांत ढोरे, अमोल नेवारे, कमलेश नेवारे, अमित बुराडे, राहुल कांबळे, विलास अतकरी, अतुल राऊ त, तसेच न्यु सेव्हन स्टार क्रीडा मंडल व सार्वजनिक नवयुवक बाल गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.