तिबेटी महिलांचा राष्ट्रव्यापी शांती मार्च भंडारा शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:55 AM2019-04-29T00:55:04+5:302019-04-29T00:55:33+5:30
दलाई लामानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तिबेटी धर्मगुरु अकराव्या पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी तिबेटीयन महिला असोसिएशनच्या वतीने राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च काढण्यात आला आहे. या शांती मार्चचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दलाई लामानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तिबेटी धर्मगुरु अकराव्या पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी तिबेटीयन महिला असोसिएशनच्या वतीने राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च काढण्यात आला आहे. या शांती मार्चचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच स्वागत करण्यात आले.
नागपूरवरुन निघालेल्या या शांतीमार्चचे भंडाराच्या सीमेत नागपूर नाक्याजवळ आगमन होताच भारत-तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड यांनी स्वागत केले. त्यानंतर हा शांती मार्च राष्ट्रीय महामार्गाने त्रिमुर्ती चौकात पोहोचला. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याठिकाणी नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे यांनी मार्चमध्ये सहभागी सर्वांना शीतपेयाचे वितरण केले.
या मार्चमध्ये ओरिसा, छत्तीसगड व महाराष्टÑातील ८५ तिबेटी महिला सहभागी झाल्या आहेत. या मार्चचे नेतृत्व अशोसिएशनच्या सचिव डोलमा त्सिरींगकरित आहे. नागपूर ते रायपूर असा हा मार्च जाणार आहे. याच पध्दतीचा मार्च देशाच्या अन्य ठिकाणाहून म्हणजे धर्मशाळा ते चंदीगढ, देहराडून ते दिल्ली, गंगटोक ते सालूगाठा आणि मैसूर ते बंगलोर असा निघाला आहे.
भंडारा शहरात या मार्चचे स्वागत प्रसंगी मैत्री संघाचे अमृत बन्सोड, नगर उपाध्यक्ष आशु गोंडाणे, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, गुलशन गजभीये, डी. एफ. कोचे, अहुजा डोंगरे, करण रामटेके, अशीत बागडे, मोरेश्वर गेडाम, अर्जुन गोडबोले, नगरसेवक कैलाश तांडेकर, विकास मदनकर, नितीन धकाते, मनोज बोरकर, एम.डब्ल्यू दहिवले, अॅड. डी. के. वानखेडे, प्रशांत देशभ्रतार, राजेश टिचकुले, मिलिंद मदनकर, डॉ. शैलेश मेश्राम, मयुर बिसेन, भुपेश तलमले, संतोष त्रिवेदी, राहूल मेश्राम, मुन्ना नागोरी, अजीज शेख आदी उपस्थित होते.
ठावठिकाणा सांगण्यास चीनचा नकार
१९९५ मध्ये दलाई लामा यांनी सहा वर्षाचे बालक ग्येदून च्योकी नीमा यांची अकरावे पंचेन लामा म्हणून घोषणा केली. मात्र चीनने त्यांना पंचेन लामा मानण्यास नकार दिला. एवढेच नाही तर अज्ञात स्थळी डांबून ठेवले. सहा वर्षाचे असतांना चीनने अटक केलेले पंचेन आता ३० वर्षांचे झाले आहे.