तरुणाच्या मोटरसायकलसमोर आला वाघ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 05:00 AM2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:11+5:30
जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. वाघ दिसताच त्यांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे सुकली नकुल गावाकडे परत गेले.
रंजित चिंचखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड ( सिहोरा ) : पत्नी आणि मुलासह गावी जाणाऱ्या एका तरुणाच्या मोटरसायकलसमोर अचानक वाघ आल्याची घटना देवसरा ते सुकळी नकुल मार्गावरील गोंडीटोला तलावजवळ शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. अचानक वाघ समोर आल्याने त्याची पाचावर धारण बसली. रात्रीच या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. तुमसर तालुक्यातील गोंडीटोला परिसरातील शेत शिवारात पट्टेदार वाघाचे पगमार्क आढळले असून यापूर्वीही काहींना वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या भीतीने सायंकाळ होताच संपूर्ण मार्गावर लॉकडाऊन होते.
चांदपूरच्या ग्रीन व्हॅली राखीव जंगलात वाघाचे संख्येत वाढ झाली आहे. जंगल शेजारी असणाऱ्या मुरली येथे वाघाचे रोज दर्शन होत आहे. या वाघांने गाय, शेळ्या फस्त केल्या आहेत. जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. वाघ दिसताच त्यांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे सुकली नकुल गावाकडे परत गेले. त्यांनी नातेवाइकांना माहिती दिली. रात्रीच बपेरा सहायक वन परिक्षेत्र कार्यलयात माहिती देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची ज्ञानेश्वरकडून वाघाची माहिती घेतली.
बिसेन यांना वाघ दिसलेल्या अर्ध्या किमी. परिसरात गेल्या वर्षात पट्टेदार वाघाने तीन जनावर हल्ला केला होता. शनिवारी सकाळी गोंडीटोला मार्गावर पट्टेदार वाघाचे पगमार्क आढळून आले. ही माहिती होताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हरीण आणि रानडुक्कराच्या मागावर वाघ
- गोंडीटोला, बिनाखी गावांचे शेत शिवारात हरीण व रानडुक्कराचे कळप दिसून येत आहेत. आता त्यात पट्टेदार वाघाने भर घातली आहे. असल्याने शिकारीसाठी वाघ त्यांच्या मागावर असतो. या तीन गावांचे शिवारात वाघाला शिकार प्राप्त होत असल्याने वाघ तळ ठोकून राहत असल्याची माहिती आहे.