सिहोरा परिसरात वाघाची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:29 PM2017-12-19T23:29:09+5:302017-12-19T23:30:57+5:30

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे जंगल शेजारी असणाऱ्या गावात वाघाची दहशत कायम आहे.

Tiger strike in Sihora area | सिहोरा परिसरात वाघाची दहशत कायम

सिहोरा परिसरात वाघाची दहशत कायम

Next
ठळक मुद्देचार गावात वाघाचे दर्शन : सायंकाळ होताच गावकºयात भीती

आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे जंगल शेजारी असणाऱ्या गावात वाघाची दहशत कायम आहे. चार गावांमध्ये वाघाने नागरिकांना दर्शन दिले आहे. गावकऱ्यांनी या वाघाला जंगलाचे दिशेने पळवून लावले आहे. सायंकाळ होताच गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. गावात वाघ दिसल्याची सूचना वनविभागाचे कर्मचाऱ्यांना दिली जात आहे.
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनाचे विस्तारीत आणि संरक्षित जंगलात वाघांचे संख्येत वाढ झाली आहे. बावनथडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने मध्यप्रदेशातील वाघांचा या जंगलात शिरकाव सुरु झाला आहे. ५ ते ७ वाघांचे आगमन या जंगलात झाले असल्याची माहिती मिळाली आहे. जंगलात वन्य प्राण्याची वाढती संख्या असल्याने अद्यापपर्यंत या वाघानी शेजारी असणाऱ्या गावात जनावरांचे नुकसान केले नाही.
या वाघाने रानडुकरांची शिकार केली आहे. रात्री चांदपूर जलाशयात वाघाचे अस्तित्व असल्याचे अनुभव नागरिकांनी घेतला आहे. वाघाने धनेगाव शिवारात ठिय्या मांडला असता गावकऱ्यांऱ्यांनी या वाघाला जंगलाचे दिशेने पळवून लावले आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा याच वाघाने धनेगाव शिवार गाठले आहे. गावकऱ्यांचे आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाचे दिशेने पलायन केले आहे. याच दिवशी दावेझरी गावात वाघ असल्याचे नागरिकांना दिसून आला आहे. या गावांचे २० कि.मी. अंतरावर असणाºया सुकळी (नकुल) गावाचे नर्सरी क्षेत्रात वाघ असल्याचे दिसताच नागरिकांची भंबेरी उडाली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत या वाघाचा शोध घेण्यात आला आहे. दुसºया दिवशी मुरली गावाचे शेजारी वाघ असल्याचे दिसून आला आहे. लहान बालकांपासून महिला व पुरुषांनी वाघाचे दर्शन घेतले आहे. या वाघाचे डरकाळी फोडणारे आवाज मुरलीवासीयांचे कानावर रोज पडत आहे. यामुळे गावात भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Tiger strike in Sihora area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.