ईटगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:16 AM2017-07-22T01:16:43+5:302017-07-22T01:16:43+5:30

ईटगाव परिसरात मागील दोन दिवसांपासून वाघाचा धुमाकुळ सुरु आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाला असुन एका पाळीव कुत्रीला जखमी केले.

The tigers of the tigers in the Eetgaon area | ईटगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ

ईटगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ईटगाव परिसरात मागील दोन दिवसांपासून वाघाचा धुमाकुळ सुरु आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाला असुन एका पाळीव कुत्रीला जखमी केले. वाघाच्या भीतीमुळे या परिसरात ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
दोन दिवसापुर्वी रात्रीच्या सुमारास इटगावच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक राऊत यांच्या शेतातील घराच्या परिसरात वाघाने प्रवेश केला. त्यावेळी पाळीव कुत्र्यांनी भुंकण्यासाठी सुरूवात केली. त्यावेळी वाघ या कुत्र्यांवर धावत आला. घरापर्यंत आलेल्या वाघाने अंगणातील कुत्रीवर हल्ला केला. त्यामुळे राऊत यांची अभय व उदय राऊत ही मुले उठले तेव्हा वाघ बाहेर जाताना दिसला. त्यावेळी पाळीव कुत्री वाघाच्या दिशेने धावताच वाघाने तिला पकडले. यात कुत्री जखमी झाली. त्याचवेळेस रात्री १ वाजताच्या सुमारास परत या वाघाने चंद्रभान चंदनखेडे यांच्या घराकडे आला. या वाघाने तेथे बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन जखमी केले. तेव्हा घरातील लोक उठताच वाघ पळून गेला. पण शेळीचा मृत्यू झाला होता. ही शेळी आठ हजार रूपये किंमतीची होती.
या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी अड्याळ वनविभाग कार्यालयाला देण्यात येताच वनकर्मचाऱ्यांनी पाहणी करून पचंनामा केला. प्रत्यक्षदर्शीनुसार हल्ला करणारा वाघच असल्याचे सांगितले. परंतु वनविभागाने तो बिबट्या असल्याचे सांगितले.
वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या ईटगावच्या नदीच्या पलीकडे उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी वनपरिक्षेत्राचे जंगल आहे. त्यामुळे त्या जंगलातून वाघाचे या परिसरात येणे जाणे सुरु असते. या परिसरात नदी, नाले व उसाचे मळे असल्यामुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी जागा आहे. या परिसरात वाघाची दहशत असल्याचे गावकरी सांगत आहेत. नदीला पुर असल्यामुळे नदीपलीकडे या वाघाला जाता येत नसल्यामुळे परिसरात मुक्काम ठोकून आहे.

तो वाघच -उदय राऊत
जर्मन शेफर्ड कुत्रीवर वाघ धावल्यामुळे ती पलंगात शिरताच रात्री जाग आल्यानंतर अभयला उठविले तेव्हा वाघ जाण्यास निघाला तेव्हा कुत्री परत वाघावर धावली. त्यामुळे वाघाने कुत्रीवर हल्ला करुन जखमी केले तेव्हा आम्ही धावुन कुत्रीला वाचविले. टार्चच्या प्रकाशात तो वाघच असल्याचे पाहिले आहे.
तो बिबट - बेलखोडे
ईटगाव येथील घटनेची आमच्या वनकर्मचाऱ्यांनी पाहणी करुन पंचनामा केला असता हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: The tigers of the tigers in the Eetgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.