थकीत मानधनासाठी आयटकचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:00 PM2018-12-24T22:00:23+5:302018-12-24T22:00:40+5:30

वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा आयटकतर्फे पाणलोट सचिवांच्या थकित मानधनाला घेवून सोमवारी धरणे देण्यात आले. सदर आंदोलन त्रिमुर्ती चौकात करण्यात आले. यात जिल्हाधिकाºयांना तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Tight dam | थकीत मानधनासाठी आयटकचे धरणे

थकीत मानधनासाठी आयटकचे धरणे

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा आयटकतर्फे पाणलोट सचिवांच्या थकित मानधनाला घेवून सोमवारी धरणे देण्यात आले. सदर आंदोलन त्रिमुर्ती चौकात करण्यात आले. यात जिल्हाधिकाºयांना तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पाणलोट सचिवांचे आजपर्यंत संपूर्ण थकीत मानधन देण्यात यावे, थकीत प्रवासभत्ता व कार्यालयीन खर्च अदा करण्यात यावा, पाणलोट समिती सचिवांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात यावे, यासह अन्य १६ मागण्यांचा पूर्ततेसाठी या सचिवांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यासमोरील त्रिमुर्ती चौकात धरणे देण्यात आले. आंदोलाचे नेतृत्व आयटकचे जिल्हाकार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके, पाणलोट संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर घाटबांधे, उपाध्यक्ष रमेश गोमासे व सचिव भैय्याजी मलोडे यांनी केले.
मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंदूराव चव्हाण यांनी पाणलोट सचिवांचे थकीत मानधन लवकरच काढून देण्यात येईल, असे मान्य केले. तसेच शासनस्तरावरच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शासनाने मागण्यांची पुर्तता त्वरीत करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने आगामी फेब्रुवारी महिन्यात मुंबई मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असेही संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले. यावेळी मौसम पवनकर, रामदास राघोर्ते, नितीन मोहारे, अनिल भुसारी, पुनेश्वर रामटेके, सरोज भवरिया, मंजू बावनकर, किशोर बनकर, ईश्वर निंबार्ते, भारगौव वाघमारे, भुमेंद्र गाते आदी उपस्थित होते. आंदोलनाचे संचालन हंसराज झलके यांनी तर आभार जागेश्वर पाल यांनी मानले.

Web Title: Tight dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.