वेळेचा खोळंबा,खातेधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:17 PM2018-08-06T22:17:59+5:302018-08-06T22:18:15+5:30

देव्हाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या रोजच्या भांडणामुळे खातेदार त्रस्त आहेत.

Time detention, the account holders suffer | वेळेचा खोळंबा,खातेधारक त्रस्त

वेळेचा खोळंबा,खातेधारक त्रस्त

Next
ठळक मुद्देदेव्हाडा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रकार : व्यवस्थापक व परिचराच्या भांडणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : देव्हाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या रोजच्या भांडणामुळे खातेदार त्रस्त आहेत.
६ आॅगस्ट रोजीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. अपशब्दांचा वापर सर्वांसमक्ष केला गेला. दारू पिऊन कामावर येत असल्याचा तर बायकांचे फोन नंतर मागीत असल्याचा आरोप प्रत्यारोप झाले. त्यांच्या भांडणामुळे अनेक खातेदारांना परत गेले. तर बºयाच खातेदारांना दोन तास ताटकळत रहावे लागले. विड्राल किंवा अन्य देवानघेवानांची कामे वेळेवर केली जात नाही. सहकार्य केले जात नाही. परिणामी खाते बंद करा, असा निर्वाणीचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील व्यवस्थापक छगन डेकाटे व परिचर यशवंत खंडाते यांचे भांडण व सर्वासमक्ष वादविवाद नेहमीचेच झाले आहे. अशिक्षित व अडानी ग्राहकांना साधे विड्राल फार्म भरून दिले जात नाही. विड्राल भरून मागण्यासाठी त्यांना गावभर फिरावे लागते. कार्यालयात साफसफाई केली जात नाही. कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाही. पिण्याचे साधे पाणीही ग्राहकांना दिले जात नाही. लहान लहान कामासाठी ग्राहक खातेदारांना ताटकळत ठेवले जाते. परत पाठविले जाते. ग्राहकांसमोर कडाक्याचे भांडण करून सर्वांसमक्ष अपशब्दांचा वापर केला जातो. ग्राहकांनी बँकेत सुरू असलेल्या गोंधळासंबंधी अनेकदा बँक प्रशासनाला माहिती दिली परंतू अजुनही कारवाई झालेली नाही. बँक प्रशासनही नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

परिचर दारूच्या नशेत आज उशिरा कामावर आल्याचा जाब विचारला तर त्याने उलट उत्तर देत वादावाद केले. याअगोदरही त्यांच्या तक्रारी केल्या आहेत.
-छगन डेकाटे, बँक व्यवस्थापक, मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, देव्हाडी
सुट्टीचा अर्ज देण्यासाठी आज बँकेत गेलो असता उशिरा आल्याचे कारणावरून माझेशी भांडण केले.
-यशवंत खंडाते, परिचर,, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, देव्हाडी.

बँकेतील प्रशासन ग्राहकांना वेळेवर सेवा देत नाही. विड्राल किंवा खातेदारांना अन्य सुविधा पुरवित नाही. नेहमी भांडण करतात. निराधार व अन्य ग्राहकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.
-झगडू बुद्धे, माजी सभापती, देव्हाडा खुर्द
आजच्या सारखा वारंवार वादविवाद केला जातो. त्यामुळे ग्राहक व ठेवीदार बँकेच्या व्यवहाराला कंटाळले आहेत. येथे भांडण आता नित्याची बाब आहे. गरिबांना येरझारा घालण्यास मजबूर केले जाते. कारवाई होणे गरजेचे आहे.
-महादेव पचघरे, पंचायत समिती सदस्य निलज बुज.

Web Title: Time detention, the account holders suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.