पीओपीमुळे मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:43 PM2018-08-31T21:43:18+5:302018-08-31T21:44:24+5:30
हिंदू धर्मातील गणेश उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मी पूजन आले का या माती मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात. मात्र या विज्ञान युगात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापराने कमी वेळात व सुंदर मूर्तींची निर्मिती होत असल्याने जिल्ह्यातील कुंभारबांधव व मातीमूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
प्रकाश हातेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : हिंदू धर्मातील गणेश उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मी पूजन आले का या माती मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात. मात्र या विज्ञान युगात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापराने कमी वेळात व सुंदर मूर्तींची निर्मिती होत असल्याने जिल्ह्यातील कुंभारबांधव व मातीमूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून संबोधल्या जातो. जिल्ह्यात विविध प्रकारची माती उपलब्ध आहे. मुर्तीकारांना पर जिल्ह्यात जावे लागत नाही. शहरी भागात मातीचे मुर्तीला प्रचंड मागणी आहे. मात्र काही मुर्तीकार पैशाच्या हव्यासापोटी कमी वेळा जास्त पैसे कसे कमविता येईल. म्हणून प्लास्टिकच्या साच्याद्वारे प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती तयार करीत आहेत. तर काही मोठे धनदांडगे मूर्तिकार पर जिल्ह्यातून मूर्तींची आयात करित आहेत.
प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. विसर्जन स्थळ नदी, नाले, तलावात पाण्यावर तरंगतात. पीओपीमध्ये रसायन असल्याने जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. नदी, नाले, तलावातील दूषित पाणी पाळीव जनावरे पितात व त्यांना विविध आजाराचा सामना करावा लागतो. तर जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात.
श्रद्धाळू देविदेवतांची दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून ती मुर्ती पाण्यावर तरंगतच राहत असल्याने त्या मूर्तीची व श्रद्धेची विटंबना नव्हे काम असा प्रश्न अनेक श्रद्धाळू करीत आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्यांना लाल रंगाची मार्कींग असने बंधनकारक आहे तर मूर्र्र्तींवर मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही अशा मूर्ती राजरोसपणे बाजारात उपलब्ध असतात. ही प्लॉस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती विकणाऱ्या ग्राहकांना साडू मातीची मूर्ती असल्याचे सांगून शासनाची व ग्राहकांची दिशाभूल करित आहेत. अशा मूर्र्तींचे विसर्जन करतेवेळी उपलब्ध असलेले पाण्याची ठिकाणी आसरा घेतल्यामुळे या मूर्ती पाण्यावर तरंगतांना दिसतात. त्यातही अनेक मुर्त्या विद्रुप अवस्थेत आढळतात. या प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये असलेल्या रसायनामुळे हे पाणी प्रदूषणयुक्त असते. त्यामुळे आरोग्याला धोका उद्भवतो.
पवनी तालुक्यात कुंभार व मूर्ती कलावंत २० ते २५ च्या घरात असून बार महिन्यातून दोन महिने मुर्त्या तयार करून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा पिढ्यान पिढ्या चाललेला व्यवसाय आहे. मात्र जिल्ह्यात भंडारा, कोंढा, पवनी, तुमसर, लाखनी आदी नामवंत मुर्तीकारांनी प्लॉटर आॅफ पॅरिसच्या लहान मूर्तीपासून ६ ते १० फुट उंच मुर्त्या परजिल्ह्यातून आयात करित आहेत.
मानवी जीवास धोका निर्माण ठरू शकणाऱ्या आणि कुंभार समाजाचा व मातीमुर्ती कलावंताचा रोजगार हिरावणाºया प्लॉटर आॅफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीवर कायमची बंदी घालण्याची मागणी जिल्ह्यातील कुंभार ग्राहकांना साडू मातीची मूर्ती असल्याचे सांगून फसवितात. अशा मुर्ती विसर्जन करतेवेळी उपलब्ध असलेले पाण्याचे ठिकाणी आसरा घेतल्यामुळे या मूर्र्तीं पाण्यावर तरंगताना दिसतात त्यातही त्या खंडीत अवस्थेत आढळतात. अशावेळी धार्मिक भावनाही दुखावण्याचे प्रकारही घडतात.
दुसरीकडे जलचरांसह मानवी आरोग्याला धोका उद्भवतो. मानवी जीवास धोका निर्माण ठरू शकणाऱ्या आणि कुंभार समाजाचा रोजगार हिरावणाऱ्या प्लॉटर आॅफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीकर कायमची बंदी घालण्याची मागणी जिल्ह्यातील कुंभार समाज व माती मूर्तिकारांनी केली आहे.
शाळू माती व काळी मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री करतात. अशा मूर्त्यांची चौकशी करून त्या मूर्तिकारांवर कडक कारवाई करून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणा व ग्रामीण कलावंतांना न्याय द्या.
-गजानन बावणे, मूर्तिकार रोहा.
ज्या मूर्त्यांपासून मानवाला व सुक्ष्म जीव जंतूला हानी होतो अशा मुर्तीवर बंदी घालून ग्रामीण मूर्ती! कलावंतांना न्याय द्या तरच ही कला जिवंत राहील.
-कलीम शेख, निसर्ग प्रेमी अड्याळ.
प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्तीने होणारा जलप्रदूषण व ही मुर्ती पाण्यात डूबत नसल्याने होणारा देविदेवतांची विटंबना होत आहे तर सदर मुर्ती घेतेवळी हे मुर्तीकार साडू मातीची मूर्ती असल्याचे सांगून विक्री करतात हे माझे घेतलेले अनुभव आहे. करिता या मूर्र्तींवर शासनाने बंदी आणावी.
-रिंंकू सलूजा, सामाजिक कार्यकर्ता.