जिल्हा परिषद निवडणूक आघाडीचा निर्णय योग्यवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:35+5:302021-02-27T04:47:35+5:30

भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व ...

Timely decision of Zilla Parishad election front | जिल्हा परिषद निवडणूक आघाडीचा निर्णय योग्यवेळी

जिल्हा परिषद निवडणूक आघाडीचा निर्णय योग्यवेळी

Next

भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे धानाची पूर्ण क्षमतेने भरडाई होईल, आणि गोदामांची समस्याही सुटेल, असे त्यांनी सांगितले. धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आला तेव्हापासून संपूर्ण धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी येत आहे. सध्या धानाला २५६८ रुपये भाव मिळतो. धानाची जिल्ह्यात विक्रमी खरेदी होत आहे. गोदामांची संख्याही हळूहळू वाढणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, व्यापारी आणि मिलर्स यांच्या समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, धनंजय दलाल आदी उपस्थित होते.

बॉक्स

कोरोना काळातील नियम सर्वांच्या हिताचे

महानगरासह सर्वत्र कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहे. नागपूर, अमरावती जिल्ह्यात वाढणारे रुग्ण चिंतेचा विषय आहे. मात्र अलिकडे मृतांची संख्या कमी होत असून ही स्थिती दिलासादायक आहे. सरकारने सर्व जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संदर्भात करण्यात आलेले नियम सर्वांच्या हिताचे असून त्याचे पालन प्रत्येकाने करावे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. कोरोना संकटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सर्व कार्यक्रम स्थगित केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Timely decision of Zilla Parishad election front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.