अवकाळीने धान उत्पादक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:59+5:30
लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर कधी अवकाळी पाऊस व गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले आहेत. हातात आलेले उन्हाळी धानपिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.
लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.
काही धानाचा निसवा होण्यापूर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुक्त धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकऱ्यांत वर्तविली जात आहे.
या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरताना ऊन्हाळी पीक ऊत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे. महागडे बी-बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर ऊन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, खरीप हंगामात व ऊन्हाळी हंगामातही पावसाचे थैमान सुरु असल्याने निसर्ग कोपात अडकलेला शेतकरी पुढील काही महिन्यात सुरु होणाºया खरीप हंगामातही संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्रभर वीज खंडित
पालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून सुसाट जोरदार वादळी वाºयासह विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पालांदूर परिसरातील मऱ्हेगाव व पाथरी येथे गारपीट झाल्याची माहिती आहे. शेत शिवारातील झाडे उन्मळून पडली. मºहेगाव येथील कौलारू साध्या घरांचे नुकसान झाले. तई येथील गोपीचंद भंडारकर यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले.
उन्हाळी धानाचा हंगाम जोमात सुरू असताना वादळी वारा व पावसामुळे शेतकºयांच्या कळपा भिजल्या. हमीभाव खरेदी केंद्रावरील धान सुद्धा ओले झाले. शेतकºयांच्या शेतावरील मळणी करून विक्रीसाठी उपलब्ध असलेले धानाची पोते सुद्धा ओली झाली. पालांदूर - आसगाव मार्गावर दोन ठिकाणी वीज पडल्याने रात्रभर वीज प्रवाह खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे आबालवृद्धांना त्रास सहन करीत महावितरणवर रोष व्यक्त करण्यात आला. पोहरा येथून पालांदूरला जोडण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित वीज दाब न मिळाल्याने अख्खी रात्र अंधारातच डासांच्या सोबतीने पालांदूर परिसरातील ५४ गावे संकटात होती.
वीज अभियंता व प्रधान तंत्रज्ञ यांच्यासह संपूर्ण वीज कर्मचारी अख्ख्या रात्रभर आसगाव ते पालांदूर या ३३ केव्ही वर दोष शोधण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र त्यांना
वीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यू
मासळ : वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. सदरची दुर्घटना शुक्रवारी १५ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे घडली. किन्ही गुंजेपार गावापासून जवळपास १० किमी अंतरावर विश्वनाथ भेंडारकर यांच्या शेतात तालुक्यातील अन्य काही शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांचा ठिय्या होता. दिवसभर शेळ्यांना चराई करुन आणून राञीदरम्यान त्यांना शेतशिवारात बांधल्या जात असे. यातच विज कोसळून शेतशिवारात असलेल्या तब्बल १५ शेळ्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत जैतपूर (बारव्हा) येथील हिरालाल ठाकरे, शुत्तम कोरे, निलेश गोमासे, गौरी नागोसे, चोपराम पंधरे यांच्या शेळ्या मृत्युमुखी पडल्या. नुकसान भरपाईची मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.