९०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

By admin | Published: September 10, 2015 12:26 AM2015-09-10T00:26:07+5:302015-09-10T00:26:07+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ९०० कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन प्रलंबित आहेत.

Tired of 9 00 staff wages | ९०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

९०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

Next

भंडारा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ९०० कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन प्रलंबित आहेत. सुमारे सात कोटी रूपयांची थकबाकी असल्याने अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत ३२ शाळांमधील सुमारे ८९६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य शासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती नसल्याचे कारण पुढे करून येथील कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापासूनचे वेतन थकित केले आहे.
याबाबत अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने प्रकल्प कार्यालय तथा अप्पर आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देवून थकित वेतन देण्याची मागणी केली. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Tired of 9 00 staff wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.