तंबाखूचे व्यसन म्हणजे विकत घेतलेले साक्षात मरणच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:29+5:302021-06-01T04:26:29+5:30
जागतिक तंबाखूमुक्ती दिनाच्या निमित्ताने सोमवारी येथील बीटीबी सब्जी मंडीत येथे शेतकरी, हमाल, व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले ...
जागतिक तंबाखूमुक्ती दिनाच्या निमित्ताने सोमवारी येथील बीटीबी सब्जी मंडीत येथे शेतकरी, हमाल, व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जज्ज्ञ मार्गदर्शक राजू देशमुख, कृषी तंत्रज्ञ सुधीर धकाते उपस्थित होते. दरवर्षी तंबाखूच्या सेवनाने हजारो लोकांना जीव गमवावा लागतो. भारत देशाचा विचार केल्यास दहा लाख लोकांचा जीव तंबाखूच्या चघळल्याने आजार होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. आपल्याही मंडीतील काही होतकरू तरुण व्यापारी, शेतकरी छुप्या मार्गाने तंबाखूचे सेवन करतात. हे निश्चितच योग्य नाही. आपण सुसंस्कृत भारताचे जागृत नागरिक आहोत. आपल्यावर आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कारांचा ठसा उमटलेला आहे. तेव्हा व्यसनमुक्त जीवन हेच खरे आयुष्याचे मूळ मंत्र आहे, असे बारापात्रे यांनी सांगितले. व्यापारी लहानशा नंदुरकर, अजय भोंगाडे, अतुल मानकर आदीसह अनेकांनी तंबाखू न खाण्याची शपथ घेतली. सुरेश राऊत, उमेश गरपडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले. संचालन संजय चव्हाण, आभार सुधीर धकाते यांनी मानले.