शेतकऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:29 PM2018-10-10T21:29:33+5:302018-10-10T21:29:57+5:30

From today to chain fasting, chain fasting | शेतकऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण

शेतकऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण

Next
ठळक मुद्देसामूहिक जलसमाधीचा इशारा : प्रकरण प्रकल्पाचे पाणी धान पिकाला मिळवून देण्याचे, शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतरही मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी गुरूवार ११ आॅक्टोबरपासून पांढराबोडी रोडवरील किसान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सलग आठवडाभर हे साखळी उपोषण केले जाणार असून, तोपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास विजयादशमीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या कोणत्याही नहरात अनेक शेतकरी सामुहिक जलसमाधी घेतील, अशी माहिती माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी शहरातील किसान चौक येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले जात नसल्याने उद्भवलेली स्थिती, त्यातून वाढत चाललेला संताप आणि आता सुरू होणार असलेली शेतकऱ्यांची निर्णायक लढाई यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्य:स्थितीत धान पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता असून, पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. धानाचे अत्याधिक उत्पादन होत असलेल्या भंडारा जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.
भंडारा तालुक्यातील बहुतेक शेती पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असून, काही दिवसापूर्वीच पेंचच्या पाण्यासाठी खुशीर्पार येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात मुजबी येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी जलसंपदा आणि महसुल विभागाच्या अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले. परंतु, भंडारा तालुक्याला पेंच प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही.
याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होणार असून, आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव आतमहत्या करण्याची वेळ येवू शकते. शेतकरी संकटात असताना प्रकल्पाचे पाणी सोडले जात नाही आणि पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. ही गंभीर बाब असून, पेंचच्या पाण्यासाठीची लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज, पाणीपट्टी कर, विद्युत बिल आदिंची वसुली न करता एक वषार्ची स्थगिती देण्यात यावी, भंडारा तालुक्याकरिता स्वतंत्र उपसासिंचन योजनेला मंजूरी प्रदान करून तातडीने काम पूर्ण करावे आणि २४ तास पाणी पुरवठा करण्यात यावा, आदि मागण्यांकरिता भंडारा शहरातील पांढराबोडी रोडवरील किसान चौकात गुरूवार ११ आॅक्टोबरपासून सर्वपक्षीय शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत.
पहिल्या दिवशी सुरेश धुर्वे, १२ ला बाबूजी सेलोकर, १३ ला धनराज साठवणे, १४ ला राजू धुर्वे, १५ ला राजेश सार्वे आणि चकोले, १६ ला चेतन भुरे आणि १७ आॅक्टोबरला स्वत: नरेंद्र भोंडेकर हे या साखळी उपोषणाचे नेतृत्व करणार आहेत. साखळी उपोषणाच्या अखेरच्या दिवशीपर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचले नाही तर १८ आॅक्टोबर रोजी विजयादशीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या एखाद्या नहरात शेतकरी सामुहिक जलसमाधी घेतील, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी जबाबदार असतील, असेही नरेंद्र भोंडेकर यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, आज बुधवारी किसान चौकातील शेतकरी पुतळ्याला माल्यार्पण करून सर्वपक्षीय शेतकºयांची बैठक घेण्यात आली. पत्रकार परिषदेला भंडारा तालुक्यातील शेतकरी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: From today to chain fasting, chain fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.