ओबीसी संघटनांची नागपुरात आज बैठक
By admin | Published: June 19, 2016 12:23 AM2016-06-19T00:23:50+5:302016-06-19T00:23:50+5:30
ओबीसी समाज आरक्षण, शिष्यवृत्ती, क्रिमिलेयरसह शासनाने अद्याप न काढलेले फ्रीशीपचे शासन निर्णयासह इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी
भंडारा : ओबीसी समाज आरक्षण, शिष्यवृत्ती, क्रिमिलेयरसह शासनाने अद्याप न काढलेले फ्रीशीपचे शासन निर्णयासह इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोबतच विदर्भात ओबीसीचे संघटन बळकट करण्यासाठी विदर्भस्तरीय ओबीसी संघटनेचे गठण करण्याच्या उद्देशाने नागपूर येथे विदर्भस्तरीय सर्व ओबीसी संघटनाची बैठक सकाळी ११ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, अजनी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत ओबीसीची जनगणना करण्यात यावी तसेच स्वतंत्र ओबीसींचे मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसींना क्रिमिलेयरची असंवैधानिक लादलेली अट रद्द करुन एससीएसटी प्रमाणे सवलत देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, केंद्राच्या १०० टक्के शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसींना शिक्षणासोबतच नोकरीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसींच्या विद्याथ्यार्सांठी एमपीएससी व युपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावे, ओबीसीची विदर्भस्तरीय कार्यकारीणी गठित करणे, मागील दोन वषार्पासून भाजपसरकारच्या सामाजिक न्याय विभागाने ओबीसींच्या हिताचे कुठलेच काम केलेले नाही.
शिष्यवृत्तीचा प्रश्न रेंगाळत ठेवला असून अद्यापही (फ्रीशिप) शासन निर्णय काढलेला नाही, ओबीसी विरोधी सरकारच्या विरोधात २०१८ मध्ये विदर्भात ओबीसी जनजागृती रथयात्रा काढणे, या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
ओबीसी समाजातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी व चळवळीतील सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समिती, बहुजन संघर्ष समिती, ओबीसी एकता मंच आदी संघटनांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)