मनसर तिरोडा राष्ट्रीय महामार्गावर माडगी शिवारात होणार टोलनाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:34 AM2020-12-29T04:34:00+5:302020-12-29T04:34:00+5:30
मोहन भोयर तुमसर: तालुक्यातील माडगी शिवारात मनसर तिरोडा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका प्रस्तावित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग ...
मोहन भोयर
तुमसर: तालुक्यातील माडगी शिवारात मनसर तिरोडा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका प्रस्तावित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे ८७ किलोमीटर करिता ५६० कोटींचा रस्ता बांधकाम करीत आहे. मनसर गोंदिया राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग मध्ये परावर्तीत करण्यात आले. मनसर सालई ४४ किलोमीटर रस्ता बांधकामाकरिता २८० कोटी रुपये खर्च करण्यात आले. सालई ते तिरोडा ४३ किलोमीटर त्याकरिता पुन्हा २८० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. रस्त्याची एकूण लांबी ८७ किलोमीटर आहे. मनसर ते तिरोडा दरम्यान टोल नाका तुमसर तालुक्यातील माडगी शिवारात मंजूर करण्यात आला असून त्याचे बांधकाम सुरू असून रस्ता बांधकामाला विलंब होत आहे. तिरोडा - गोंदिया रस्ता प्रस्तावित: प्रथम टप्प्यात मनसर तिरोडा बांधकामाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तिरोडा गोंदिया रस्ता प्रस्तावित आहे. मन सर तिरोडा रस्ता काम सन २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी या रस्त्यावर लहान मुलांचे बांधकाम सुरू आहे काही ठिकाणी एकही मार्ग सुरू असून तो धोकादायक ठरत आहे वैनगंगा नदीवर माड गी येथे दुसऱ्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे.
बॉक्स
टोल नाक्याचा स्थानिकांना भुर्दंड:
साकोली मार्गावरील वाहनधारकांना टोल नाक्यावर आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक वाहनधारकांना सुद्धा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता अधिक आहे. तुमसर माडगी दरम्यान लहान-मोठी अनेक वाहने धावतात त्यांना सुद्धा टोल द्यावा लागणार आहे. मनसर नंतर साठ किलोमीटर अंतरावर माडगी शिवारात टोल नाका प्रस्तावित आहे.किमान ४० कि.मी.नंतर टोल नाका प्रस्तावित करण्याची गरज होती. अर्ध्या पेक्षा जास्त की.मी.वर टोल येथे मंजूर करण्यात आले. असे असले तरी स्थानिक वाहनधारकांना येथे टोल पासून सूट देण्याची गरज आहे.
कोट
मनसर तिरोडा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर माडगी शिवारात टोल नाक्याला मंजुरी देण्यात आली आहे. टोल नाक्याचे काम सध्या सुरू आहे. २०२१ मध्ये रस्ता बांधकाम पूर्ण होणार आहे.
संजीव जगताप, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग. भंडारा.