उपोषणकर्त्यांचे टमाटर फेको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:15+5:30
राजेगाव येथील नागरिक २९ फेब्रुवारीपासून भंडारा येथे साखळी उपोषणाला बसले आहेत. प्रशासन व कारखाना व्यवस्थापनाचे अतिक्रमण काढण्याविषयी टाळाटाळ करीत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी मार्च २०१९ ला सदर कंपनीचे अतिक्रमण असल्याचे लेखी पत्र दिले. ते अतिक्रमण काढण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या २६ एकर जागेवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी १९ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी गुरुवारी सहायक जिल्हाधिकारी यांच्या विरोधात 'टमाटर फेको' आंदोलन करण्यात आले.
राजेगाव येथील नागरिक २९ फेब्रुवारीपासून भंडारा येथे साखळी उपोषणाला बसले आहेत. प्रशासन व कारखाना व्यवस्थापनाचे अतिक्रमण काढण्याविषयी टाळाटाळ करीत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी मार्च २०१९ ला सदर कंपनीचे अतिक्रमण असल्याचे लेखी पत्र दिले. ते अतिक्रमण काढण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. परंतु काही प्रशासकीय अधिकारी अतिक्रमण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. परंतु आतापर्यंत सहा मोर्चे, दोनदा उपोषण करुनही सहायक जिल्हाधिकारी मवाळ भुमिका घेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी २९ फेब्रुवासरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला सहा दिवसाचा कालावधी लोटूनही मागण्यांविषयी प्रशासन गंभीर नसल्याने गुरुवारी शशिकांत भोयर यांच्या मार्गदर्शनात संतप्त ग्रामस्थांनी सहायक जिल्हाधिकारी यांच्या विरोधात टमाटर फेकून अनोखे आंदोलन केले.
सहायक जिल्हाधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, कारखान्याचे प्रबंधकाने महिला सरपंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी, अन्यथा १० मार्च रोजी उग्र आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनात उपपोषणकर्त्यांसह शशिकांत भोयर, कुंजन शेंडे, अचल मेश्राम, शिवराम शेंडे, तुकाराम झलके, शालिक गंथाळे, अनिता शेंडे, विनायक झंझाड, भानुदास सार्वे, किशोर जनबंधू, लिलाधर नागदेवे, चंद्रशेखर मेश्राम, सुशिल मेश्राम, धवल मोहतुरे, राजकुमार शेंडे, देवराम वासनिक, रेखा वासनिक, समीर देशपांडे, शशिकांत देशपांडे, रेखा सार्वे आदी उपस्थित होते.