सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे थकित वीज बिल मंजूर

By Admin | Published: July 2, 2017 12:27 AM2017-07-02T00:27:02+5:302017-07-02T00:27:02+5:30

सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे वीज बिल थकित होते या पावसाळ्यात पाण्याचा उपसा होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला होता.

Tondo power bill sanctioned for Sonditola Lift Irrigation Scheme | सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे थकित वीज बिल मंजूर

सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे थकित वीज बिल मंजूर

googlenewsNext

७६ लाखांची तरतूद : चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे वीज बिल थकित होते या पावसाळ्यात पाण्याचा उपसा होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. आ. चरण वाघमारे यांनी राज्य शासनासपक्ष स्थितीची माहिती देऊन ७६ लक्ष रूपये मंजूर केले. यामुळे चांदपूर जलाशयात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुमसर तालुक्यातील महत्वपूर्ण उपसा सिंचन म्हणून सोंड्याटोला उपसा सिंचन गणल्या जाते. सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावाकरीता सचिंनाची सोय सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे करण्यात येते. खरीप व रब्बी पिकाकरीता चांदपूर जलाशयातून शेती करीता पाणी सोडण्यात येते.
सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. थकीत वीज बिलाच्या रकमेकरिता तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी महाराष्ट्र शासनाकडे सात्याने पाठपुरावा करून मागील दोन वर्षापासून योजनेसाठी निधीची तरतूद केली. त्यामुळे उपसा सिंचन योजनेचे पंप सुरू राहिले. चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा शक्य झाला. या थकीत बिलाची रक्कम ७६ लक्ष पर्यंत पोहोचली होती. याकरिता आ. चरण वाघमारे यांनी हिवाळी अधिवेशनात विषय रेटून धरला होता. त्यांच्या पाठपुरावामुळे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूरचे कार्यकारी संचालक यांनी ७६ लक्ष रूपये मंजुर केले असल्याचे कार्यकारी अभियंता, भंडारा पाटबंधारे विभाग भंडारा यांना कळविले आहे. ७६ लक्ष भरताच वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती आ. चरण वाघमारे यांनी लोकमतला सांगितली.

Web Title: Tondo power bill sanctioned for Sonditola Lift Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.