मंगळसूत्र घालून तरूणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:59 PM2018-12-07T21:59:20+5:302018-12-07T21:59:31+5:30

एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या आपल्याच गावातील तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याचे प्रकरण येथील राजीव गांधी चौक परिसरात उघडकीस आले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथील एका तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Torture on a young man wearing a mangasutra | मंगळसूत्र घालून तरूणीवर अत्याचार

मंगळसूत्र घालून तरूणीवर अत्याचार

Next
ठळक मुद्देतरूणावर गुन्हा : राजीव गांधी चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या आपल्याच गावातील तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याचे प्रकरण येथील राजीव गांधी चौक परिसरात उघडकीस आले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथील एका तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम तुलाराम हारगुळे (२२) रा. मोरगाव तालुका मोहाडी असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. तो भंडारा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यासाठी त्याने राजीव गांधी चौकात रूम भाड्याने घेतली होती. त्याठिकाणी राहून तो शिक्षण घेत होता. मात्र तीन वर्षापुर्वी त्याच्याच वर्गात शिकणारी आणि गावातीलच एका तरूणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या. दरम्यान सदर तरूणीला आपल्या किरायाच्या खोलीवर आणले.
त्याठिकाणी तिला विश्वासात घेवून लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नाही तर लग्न करण्याचे नाटक करीत तिच्या गळ्यात मंगळसुत्र आणि कुंकुवाने मांग भरली. यामुळे सदर तरूणीचा रामवर विश्वास बसला. यादरम्यान तिच्यासोबत अनेकदा शारीरिक अत्याचार केले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने ५ डिसेंबर रोजी मोहाडी पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी राम हारगुळेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र घटनास्थळ भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने प्रकरण भंडारा पोलिसांकडे वळते करण्यात आले. भंडारा ठाण्यात कागदपत्र प्राप्त झाल्यावरून पोलीस शिपाई पवित्रा सुरजमल शरणागत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चौथनकर करीत आहे.
जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन तरूण-तरूणी पळवून जाण्याचे प्रकारही वाढले आहे.

Web Title: Torture on a young man wearing a mangasutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.