कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती

By admin | Published: June 8, 2015 01:05 AM2015-06-08T01:05:26+5:302015-06-08T01:05:26+5:30

शहराला अगदी लागून १९ कि़मी. अंतरावर नव्याने निर्मित कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती लाभत आहेत.

Tourist destinations like Coca-Cola | कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती

कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती

Next

भंडारा : शहराला अगदी लागून १९ कि़मी. अंतरावर नव्याने निर्मित कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती लाभत आहेत.
नैसर्गिक सौदर्य व साधनसंपत्तीसह जैवविविधतेने नटलेल्या जंगलात वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होत असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांची पावले कोका अभयारण्याकडे वळत आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागूनच असलेले १०,०१३ हेक्टर वनक्षेत्र शसनाने २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला कोका अभयारण्य असे नाव देण्यात आले. ब्रिटिशकाळात ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून जे जंगल ओळखल्या जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
हे अभयारण्य वन्यजिवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित केले आहे.या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे. या अभयारण्याचा विकास डिसेंबर २०१३ पासुन सुरु झाला असून २५ नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही, त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाकी तयार करण्यात आली आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी ५-७ गाडया सोडण्यात येत असून गावातीलच १२ वी पास मुलांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीचा मार्ग ४६.५ कि.मी चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे. नागपूर-भंडारा हे ६५ कि.मी. अंतर असून भंडाराहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार १९ कि.मी. अंतरावर आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून ३ जिप्सींची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. पर्यटकांना जंगल सफारीकरीता सकाळी ५ ते ९.३० आणि दुपारी ३ ते ६.४५ या कालावधीत जाता येते. अभयारण्याला भेट देण्यासाठी आॅनलाईन बुकिंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर या प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी ५ ते ७ गाडया सोडण्यात येतात. अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमिटीचे २ टेंट आहेत. त्यामध्ये राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Tourist destinations like Coca-Cola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.