चांदपूरात उसळतोय पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:28+5:302021-02-05T08:42:28+5:30

१०० हून अधिक पर्यटकांची हजेरी : पर्यटन स्थळावरून नियंत्रण सुटले चुल्हाड ( सिहोरा ) : कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या ...

Tourists flock to Chandpur | चांदपूरात उसळतोय पर्यटकांची गर्दी

चांदपूरात उसळतोय पर्यटकांची गर्दी

Next

१०० हून अधिक पर्यटकांची हजेरी : पर्यटन स्थळावरून नियंत्रण सुटले

चुल्हाड ( सिहोरा ) : कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या नियमात शिथिलता देण्यास सुरुवात झाल्याने नागरिक बाहेर पडत आहेत. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात नागरिकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. रोज १०० हून अधिक पर्यटक हजेरी लावत असले तरी प्रशासनाचे मात्र नियंत्रण सुटल्याचे दिसून येत आहे. सैरवैर पर्यटकांची भ्रमंती धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाची उपेक्षा शासन व प्रशासन स्तरावर गेल्या २०१२ पासून करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ढिसाळ कारभार आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणाचा फटका मात्र गत वैभव प्राप्त असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला बसला आहे. ऑगस्ट २०१२ पासून पर्यटन स्थळाला कुलूप बंद करण्यात आल्यानंतर माजी आमदार चरण वाघमारे यांचे कार्यकाळात पर्यटन स्थळाला उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पर्यटन स्थळाचे विकास कार्यात आडकाठी ठरणारे मार्ग खुले करण्यात आले आहे. वन आणि महसूल विभागाच्या सीमांकनचा मार्ग मोकळा करण्यात आल्यानंतर कामे प्रभावित होणार नाहीत, या करीता सर्वच स्थरावरून शासन व प्रशासकीय अडचणी तपासण्यात आलेल्या आहेत. यानंतर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळला हस्तांतरित करण्यात आले आहे. परंतु या विभागाची यंत्रणा विकास कामासाठी कधी येतो, कधी जातो. कळायला मार्ग नाही. पर्यटन स्थळात पावणे दोन कोटी रुपये खर्चून विश्रामगृह बांधकाम करण्यात येत आहे. पर्यटकाचे सोई व सुविधा करीता कोट्यवधीचे विश्रामगृह बांधकाम करण्यात येत असले तरी ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ मात्र उपेक्षित ठेवण्यात येत आहे. या पर्यटन स्थळात पर्यटकांना भुरळ घालणारे अनेक नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत. परंतु विकासापासून कोसो दूर आहेत.

धरले तर चावते, अन सोडले तर पळते अशी अवस्था या पर्यटन स्थळाची झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत जलाशय परिसरात साधी विकासाची एक वीट पोहचली नाही. दरम्यान पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या पर्यटन स्थळाची गाथा कानाकोपऱ्यात गेली असल्याने अनेक पर्यटक रोज हजेरी लावत आहेत. झिल व जलाशयाचा आनंद घेऊन पर्यटक परतत आहेत. परंतु शासन व प्रशासकीय स्तरावर कुणी गांभीर्याने घेत नाहीत. जिल्ह्यात मॉडेल ठरणारे चांदपूर गाव आहे. या गावांचे विकास कार्यकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

बॉक्स

पर्यटन स्थळात भ्रमंती धोकादायक

चांदपूर जलाशय पाण्याने तुडुंब भरले आहे. पर्यटन स्थळात सकाळपासून पर्यटक हजेरी लावत आहेत. जलाशयाकडे वाहनांचे प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. पायदळ भ्रमंतीला मंजुरी आहे. परंतु भ्रमंती करताना लहान बालके राहत असल्याने सैरवैर हिंडताना दिसून येत आहे. जलाशय परिसरात पूर्णतः बंदी नाही. पर्यटकाना दिशा निर्देश देण्यासाठी शिपाई ठेवण्यात आले आहे. जलाशयाचे धोकादायक भागात चारचाकी वाहने शिरकाव करीत असल्याने पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. पर्यटन स्थळाकडे जाणारा मार्ग अरुंद असून सुरक्षा भिंत नाही. वाहने दरीत कोसळण्याची भीती वाहन चालकाच्या मनात राहत आहे.

Web Title: Tourists flock to Chandpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.