ट्रॅक्टर उलटला; १५ जखमी
By Admin | Published: April 16, 2015 12:27 AM2015-04-16T00:27:15+5:302015-04-16T00:27:15+5:30
लग्न आटोपून परतीच्या प्रवासादरम्यान सानगडीजवळील अर्जुनी/मोरगाव रस्त्यावरील वळणावर चालकाचा
अपघात : गंभीर जखमींना भंडारा हलविले
सानगडी : लग्न आटोपून परतीच्या प्रवासादरम्यान सानगडीजवळील अर्जुनी/मोरगाव रस्त्यावरील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात १५ वऱ्हाडी जखमी झाले. यातील आघ जण गंभीर जखमी आहेत.
एकोडी येथे आयोजित लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाडी सिरोलीला जाण्यासाठी निघाले. सानगडीवरुन अर्जुनी/मोरगांव ला जाणाऱ्या वळणावर एका सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक प्रमोद वघारे (२४) याचा वाहनावरील ताबा सुटला. यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल. त्यात १५ वऱ्हाडी जखमी झाले.
जखमींमध्ये मंगेश उके (१६), नारायण राऊ त (४०), सोईदा मखरे (५०), किरण उके (४०), रवि सिंधुपवार (२३), भास्कर लंजे (२८), नानेश्वर पंधरे (४२), नरेश ठाकरे (३५), योगेश वघारे (१९), महेश कोल्हे (२४), श्रीकांत पुराम (१६), एकनाथ मेश्राम (२०), नारायण राऊ त (४०) सर्व सिरोली यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती गजेन्द्र राठोड यांनी सानगडी पोलीस चौकी व प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली. ग्रामस्थांच्या सहकार्याने साकोली, अर्जुनी/मोर, पालांदूर तसेच नवेगांवबांध येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना सानगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अतिगंभीर आठ जखमींना भंडारा रुग्णालयात रुग्णवाहिकेने पोहचविण्यात आले. त्यात मंगेश उके (१६), नारायण राऊ त (४०), सोईदा मखरे (५०), किरण उके (४०), रविसिंधु पवार (२३), भाष्कर लंजे (२८), योगेश वघारे (१९), उमेश सुर्यवंशी (२१) यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात शिवाजी खंडाईत, उपसरपंच अविनाश रंगारी, सुनील जांभुळकर, केशव मांडवटकर, राऊ त, तसेच हेड कान्सटेबल हेमने यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जखमी
साकोली : स्कुटीने रस्ता ओलांडीत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात कारने स्कुटीस्वाराला जोरदार धडक दिली. यात स्कुटीस्वार गंभीर झाल्याची घटना ग्रामपंचायत कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी घडली. भाऊ आदीनाथ नंदागवळी (४४) रा. साकोली असे जखमीचे नाव असून त्याचेवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरु आहे.भाऊ नंदागवळी हे स्कुटी क्रमांक एम.एच.३६ बी ८२८७ ने घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडीत असताना भंडाऱ्याहून देवरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. यात नंदागवळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
साकोली येथून राष्ट्रीय महामार्ग जात असून या महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने जातात. पोलीस प्रशासनातर्फे वाहतुक पोलीसांची व्यवस्था ही कमीच आहे. फक्त शाळेच्या वेळेवर नागझिरा रोड व ग्रामपंचायत चौकात वाहतुक पोलीस तैनात असतात. इतर वेळी मात्र हे वाहतुक पोलीस लाखांदुर रोड किंवा पंजाबराव कृषी विद्यापीठाजवळ उभे असतात. चौकाचौकात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात ठेवून नियंत्रण ठेवावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.