मित्राच्या स्मृतीत रक्तदान करून पंरपरा जोपासत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:38 AM2021-02-09T04:38:26+5:302021-02-09T04:38:26+5:30
भंडारा : सर्व दानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रिय माणूस हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणीत शोक करीत ...
भंडारा : सर्व दानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रिय माणूस हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणीत शोक करीत बसण्यापेक्षा त्या स्मृती सतत कायम राहाव्यात, या उदात्त हेतूने एकत्र आलेल्या युवकांच्या धडपडीने २००२ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन रवींद्रनाथ टागोर युवा मंच बहुद्देशीय सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्यावतीने केले जात आहे.
सतत २० वर्षापासून शेकडो रक्तदाते या शिबिरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करतात. हे युवक सामाजिक जाणिवेतून आपल्या लाडक्या मित्राच्या स्मृतीत रक्तदान करुन पंरपरा जोपासत आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक मुरारी काबरा यांनी केले. रवींद्रनाथ टागोर युवा मंचच्या वतीने येथील रवींद्रनाथ टागोर चौक गौरव कॉम्पलेक्समध्ये प्रकाश सव्वालाखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सन २००१ मध्ये प्रकाश सव्वालाखे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आपल्या मित्राची एक आठवण म्हणून रवींद्रनाथ टागोर युवा मंच बहुउद्देशीय सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणीक संस्थातर्फे (दि.८ फेब्रुवारी) सोमवरला रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन भंडारा अर्बन बँकेचे संचालक डॉ. जगदीश निंबार्ते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता मुरारी काबरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडाऱ्याचे मनोज वंजानी, सामान्य रुग्णालय भंडाऱ्याच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मीरा सोनवाने उपस्थित होते. दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जात असून वर्षभरात गरजू, थॅलेसेमिया तसेच विविध आजारातील रुग्णांना या संस्थेतर्फे रक्तपुरवठा केला जातो. सामान्य रुग्णालयातील टेक्निशियन डॉ. लक्ष्मीकांत वैद्य, डॉ. राजू नागदेवे, राहुल गिरी, पंकज कातोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक बंटी मिश्रा यांनी केले.
रक्तदात्यांमध्ये गौतम जैन, मनोज संघानी, करण काबरा, विनो कनोजे, राजू साठवणे, संजय मूल, आशिष मुनीश्वर, लोकेश मुटकुरे, स्वप्नील येवले, प्रशांत डोमळे, गोविंद नवारे, सारंग बेदरकर, शेषराव कुंभारे, भूषण मुटकुरे, हितेश ठाकरे, संजय चौधरी, जितू मुटकुरे, नरेंद्र मुटकुरे, सुधीर बिरणवार, सतपाल माहुले, पूनम तिवारी, श्रीकांत आंबाडारे, नीलेश सव्वालाखे, आशिष सूर्यवंशी, मनीष चौधरी, आकाश गंधे, संजय सव्वालाखे, अभय सूर्यवंशी, चंद्रकांत सार्वे, राघव सार्वे आदींचा समावेश होता.