पारंपरिक टोपल्यांना सुगीचे दिवस

By admin | Published: May 12, 2016 12:49 AM2016-05-12T00:49:05+5:302016-05-12T00:49:05+5:30

त्यासाठी एरव्ही विशेष उपयोगात येत नसलेल्या सुपं, टोपल्या, परड्या, डाले आदी वस्तू खरेदीची लगबग सुरू झाल्याने पारंपरिक सुपं टोपल्या आदींना सुगीचे दिवस आले आहे.

Traditional baskets to harvest day | पारंपरिक टोपल्यांना सुगीचे दिवस

पारंपरिक टोपल्यांना सुगीचे दिवस

Next

उन्हाळ्यातील रोजगार : लग्नसराईत मागणी जास्त
भंडारा : त्यासाठी एरव्ही विशेष उपयोगात येत नसलेल्या सुपं, टोपल्या, परड्या, डाले आदी वस्तू खरेदीची लगबग सुरू झाल्याने पारंपरिक सुपं टोपल्या आदींना सुगीचे दिवस आले आहे.
उन्हाळ्यात सर्वत्र ग्रामीण आणि शहरी भागात महिलांची उन्हाळ्यासाठी पापड, वड्या आदी पदार्थ बनविण्यासाठी पण यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
हे पदार्थ वाळत घालण्यासाठी सुपं, मोठ्या आकारच्या टोपल्या आदींची गरज भासते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात गहू, तुरी आदी पिके निघाली आहेत.
यातील मातीचे खडे एक एक करून निवडून काढणे अनेकदा शक्य नसते. अशावेळी हे धान्य धुण्याशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी मोठ्या आकाराच्या टोपल्या, डाले, परड्या आदींची गरज भासत असते. हे धान्य खूप असल्यास ग्रामीण भागात ते नदीवर धुण्यासाठी नेले जाते.
अशावेळी मोठ्या आकाराच्या टोपल्या उपयोगी ठरतात. या सर्व प्रकारांसाठीच सध्या बांबुंच्या टोपल्या, परड्या आदींची गरज भासत असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. अक्षय्य तृतीयेच्यावेळी सरगुंडे, पापड्या, अशा वस्तू आवर्जून बनविल्या जातात. त्या वाळत घालण्यासाठी अशा प्रकारचे टोपले उपयोगी पडतात. तसेच हे पदार्थ आदल्या रात्री बनविले जातात. पण त्यांना जमिनीवर न ठेवला मोठ्या टोपल्यात कापडाने बांधून त्या वर कुठेतरी अडकवून ठेवल्या जातात. या सर्वांसाठी लाकडी टोपले फार उपयोगी पडतात.
त्यासाठीच अशा वस्तूंना सुगीचे दिवस आले आहे. या काळात सुपांची मागणीही वाढते. बाजारात प्लास्टिकचे सूप उपलब्ध असले तरी बांबूच्या सुपालाच आजही पसम्ती दिली जात आहे.
(शहर प्रतिनिधी)

उन्हातान्हात विक्री
शहरात बसस्थानक परिसरात, तसेच मार्केट परिसरात ऊन्हातान्हात या टोपल्या, डाले, परड्या आदींची विक्री केली जात आहे.
यात मोठे डाले १८० ते २०० रुपये जोडी, तर त्यापेक्षा लहान टोपलीवजा डाले ६०, ८०. १०० रुपये याप्रमाणे विक्रीस आहेत.
याच काळात अशा टोपल्या आणि इतर साहित्याला मागणी असते. तसेच उन्हाळ्यातच बांबू वाळलेला असल्याचे त्याचा दर्जा चांगला असतो.

देवाच्या परडीची मागणी वाढली
जिल्ह्यात सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. ग्रामीण भागात देवाच्या परडीला अशा वेळी वेगळे महत्त्व असते. परडीत देव ठेवून त्याची पूजा केली जाते.
लग्नसराईमुळे अशा परडींच्या मागणीत वाढ झाली आहे. यातही वेगवेगळ्या आकाराच्या परड्या उपलब्ध आहेत.
लग्नघरी छोट्या आकाराच्या टोपल्याही अशावेळी महत्त्वाच्या असतात. त्या बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे विक्रेते सांगतात.

Web Title: Traditional baskets to harvest day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.